कोल्हापूर : वृक्षप्रेमी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स, न्यू पॉलिटेक्निक कॉलेज उचगाव, ग्रीन वळीवडे टीम, वनराई फाउंडेशन शिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने ६० वृक्षांची (लोखंडी ट्री गार्ड सहित) लागवड करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, काटेसावर, आपटा, लक्ष्मीतरू, गुळभेंडी, कदंब, शिसम, बॉटल ब्रश, पांढरी सावर, आंबा, चिंच, जांभूळ, धावडा, कांचन अशा देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब महिलावर्ग, न्यू पॉलिटेक्निक कॉलेज शिक्षक, कर्मचारीवर्ग तसेच वृक्षप्रेमी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वृक्षारोपण मोहिमेमध्ये वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, रोटरी क्लब ऑफ रॉयल्स अध्यक्ष प्रिया बासरानी, वारणा वडगावकर, सविता पाटील, न्यू पॉलिटेक्निक प्राचार्य व्ही. बी. शिंदे, उदय संकपाळ, सतीश कोरडे, परितोष उरकुडे, अभिजित गडकरी, ग्रीन वळीवडे, वनराई फाउंडेशन टीम, सचिन पवार, शैलेश पवार, सीमा बुड्ढे, आयेशा गोवावाला, ऐश्वर्या मुनेश्वर, अक्षय कांबळे, रोहित पाटील आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
फोटो ओळी : वृक्षप्रेमी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने शिरोली येथे वृक्षारोपण करून छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. (फोटो-२६०६२०२१-कोल-वृक्षारोपण)