शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

महामानवास महारॅलीने अभिवादन

By admin | Published: April 14, 2016 11:40 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा उत्साह; आबालवृद्धांचा सहभाग; चित्ररथ, देखावे, डॉल्बीसह वाद्यांचा गजर

कोल्हापूर : लेझीम, झांज, बँड यासारख्या पारंपरिक वाद्यांसह डॉल्बीचा ठेका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्ररथ, सजीव देखावे, आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग अशा अपूर्व उत्साहात आणि जल्लोषी वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरात मिरवणुका काढण्यात आल्या. सूर्य मावळतीकडे झुकल्यानंतर तर शहरातील रस्त्यांवर उतरलेल्या भीमसागराला उत्साहाची भरती आली. रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता. शहरात एकूण चार मोठ्या मिरवणुका निघाल्याने सायंकाळनंतर वाहतूकही विस्कळीत होऊन गेली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती असल्याने भीमसैनिकांसह समाजातील विविध घटक आनंदात भारावून गेले होते. बुधवारी रात्री बारा वाजल्यापासून भीमसैनिकांचा जल्लोष सुरू झाला. रात्रभर भीमज्योतींचे स्वागत होत राहिले. गुरुवारी सकाळपासून उत्साहाला उधाण आले. शहरात विविध ठिकाणी लाऊड स्पीकर, स्टेरिओवर आंबेडकर यांच्या जीवनावरील ध्वनीफिती लावण्यात आल्या होत्या. विशेषत: ज्या भागात दलित समाजाची वस्ती अधिक आहे, अशा सदर बाजार, विचारेमाळ, विक्रमनगर, सिद्धार्थनगर, कनाननगर, टिंबर मार्केट, गंजिमाळ, राजेंद्रनगर, साळोखे पार्क, आदी भागांत निळे ध्वज, निळ्या पताका लावण्यात आल्या होत्या. विद्युत रोषणाई करण्यात आली होती. घरोघरी गोडधोड पदार्थांची रेलचेल होती. दिवसभर वातावरण उत्साहाने भारून गेले होते. सायंकाळनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, पुतळ्याची मिरवणूक काढण्याचे नियोजन केले होते. शहरात निघालेल्या प्रमुख चारही मिरवणुकीत भव्य-दिव्यपणा होता. विशेष म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्य त्यात सहभागी झाले होते. महिला, लहान मुलांचा उत्साह दांडगा होता. सायंकाळी सहा वाजल्यानंतर एकाचवेळी मिरवणुका सुरू झाल्या. दसरा चौक, बिंदू चौक येथून या मिरवणुका जात होत्या. दसरा चौकात छत्रपती शाहू महाराज, तर बिंदू चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घातल्यानंतर मिरवणूक पुढे सरकत होत्या. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता. सिद्धार्थनगरच्या मिरवणुकीत भव्यता येथील सिद्धार्थनगर संयुक्त तरुण मंडळाच्या मिरवणुकीत आबालवृद्धांनी भाग घेतला होता. सायंकाळी साडेपाच वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी नगरसेवक अफजल पिरजादे, महेश कदम, मंडळाचे अध्यक्ष मंगेश कांबळे, शरद कांबळे, गणेश कांबळे, सुशीलकुमार कोल्हटकर, रजनीकांत सरनाईक, स्वाती काळे, अमोल कांबळे, आदी उपस्थित होते. मिरवणुकीतील तरुण व तरुणींच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हलगीच्या ठेक्यावर लेझीम पथकाने लयबद्ध ताल धरत सादर केलेल्या प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी दाद दिली. त्यामध्ये काही लहान मुले, मुलीही सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीतील झांज पथकानेही शोभा वाढविली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत डॉल्बी तसेच एलईडी वॉलही आणली होती. एलईडीवर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महत्त्वाचे प्रसंग दाखविले जात होते, तर डॉल्बीवर भीमगीते वाजविली जात होती. डॉल्बीसह आकर्षक विद्युत रोषणाईही केली होती. डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई थिरकत होती. मिरवणुकीत तीन चित्ररथ होते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे तैलचित्र यांचा समावेश होता. सिद्धार्थनगरातील महिला पांढऱ्या शुभ्र साड्या नेसून, तर पुरुष निळे फेटे परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. रात्री उशिरा ही मिरवणूक सिद्धार्थनगर येथे विसर्जित झाली. तत्पूर्वी सकाळी महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते मंडळाच्या आवारात ध्वजारोहण, तर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मध्यवर्ती समितीच्या मिरवणुकीत मुस्लिम, धनगर, मराठा समाजाचा सहभाग होता. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या मिरवणुकीत आरपीआयमधील सर्व गट, ब्लॅक पॅँथरसह मुस्लिम, धनगर, मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ. आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती असल्यामुळे अन्य समाजातील कार्यकर्त्यांनीही मोठ्या उत्साहाने भाग घेण्याचा अलीकडील काळातील हा पहिलाच प्रसंग होता. विशेष म्हणजे भगवे आणि पिवळे फेटे बांधून कार्यकर्ते सहभागी झाले होते.दसरा चौक येथे सायंकाळी सहा वाजता श्रीमंती शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते फीत कापून मिरवणुकीचा शुभारंभ केला. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, प्रा. विश्वास देशमुख, नंदकुमार गोंधळी, व्यंकाप्पा भोसले, मराठा महासंघाने वसंतराव मुळीक, मल्हार सेनेचे बबन रानगे, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, मराठा महासंघ महिला आघाडीच्या शैलजा भोसले, अनुराधा भोसले, मंगल कुऱ्हाडे, खाटिक समाजाचे जयवंत पलंगे, लिंगायत समाजाचे डॉ. गिरीष कोरे यांच्यासह दगडू भास्कर, सुभाष देसाई, पी. के. कांबळे, भाऊसो काळे, सुरेश सावर्डेकर, दयानंद गालफाडे, सज्जन कांबळे, जयसिंग पडळीकर, जयसिंग जाधव, कुंडलिक कांबळे, आदी उपस्थित होते. या मिरवणुकीत २0 रिक्षांचा सहभाग होता. या रिक्षांवर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील फलक लावण्यात आले होते. अग्रभागी बॅँड होता. मिरवणुकीत श्रीमंत शाहू महाराज स्वत: बिंदू चौकापर्यंत चालत गेले. डिगे फौडेशन, सिद्धार्थ तालमीची मिरवणूकलक्ष्मीपुरी येथील सिद्धार्थ तालीम मंडळ आणि डिगे फौंडेशनच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे उद्घाटन देवदत्त बानगे यांच्या हस्ते हस्ते झाले. यावेळी सदानंद डिगे, विकास माजगावकर, रामचंद्र कांबळे, आदी उपस्थित होते. घोड्यांच्या रथात महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावे सादर केले होते. २५ रिक्षांवर आंबेडकरांचे जीवन चरित्र रेखाटले होते. लक्ष्मीपुरीतून सुरू झालेली ही मिरवणूक फोर्ड कॉर्नर, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, उमा टॉकीजमार्गे लक्ष्मीपुर येथे विसर्जित करण्यात आली. शहर उत्सव समिती मिरवणुकीत समता रथसीपीआर रुग्णालयापासून सुरू झालेल्या कोल्हापूर शहर आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या मिरवणुकीत उंट आणि घोडी आणण्यात आली होती. मिरवणुकीत समता रथ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेला रथ होता. मिरवणुकीचे उद्घाटन परिवहन समितीचे सभापती लाला भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी दत्ता मिसाळ, सुरेश कांबळे, दीपाली आवळे, चोखा कांबळे, अशोक समुद्रे, अनिल गजापुरे, श्रद्धा धोंडगे, रंगराव पठारकर, आदी उपस्थित होते. सुमारे तीनशेहून अधिक कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. दुपारी दोन वाजता मिरवणुकीची सांगता करण्यात आली.