कोल्हापूर : सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी त्यांना अभिवादन करण्यात आले. मल्हारसेनेचे सरसेनापती बबन रानगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बबन रानगे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे दिल्लीवर मराठीशाहीचा भगवा झेंडा फडकवण्याचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे काम श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी पूर्ण केले. त्याचबरोबर मराठीशाहीचा उत्तर हिंदुस्थानात विस्तार करण्याचे कामही त्यांनी केले. मेंढपाळ ते सुभेदार हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची रणधुरंदर योद्धा अशी ओळख जगामध्ये आहे; परंतु जातीच्या बंधनात अडकून त्यांच्या कार्याची ओळख जगासमोर आज येऊ शकलेली नाही.
स्वागत व प्रास्ताविक मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख बयाजी शेळके यांनी केले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष राघु हजारे, शहाजी शिद, छगन नांगरे, बाबूराव बोडके, विक्रम शिनगारे, अण्णासाहेब कोळेकर, विक्रम वग्रे, धोंडिराम कात्रट, काशिनाथ रानगे, विलास रानगे, अनिकेत रानगे , किरण पाटील, सुरेश वरेकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बबन रानगे, बयाजी शेळके, राघु हजारे आदी उपस्थित होते. (फोटो-१६०३२०२१-कोल-मल्हारसेना)