कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या ३६३व्या जयंतीनिमित्त शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले.प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संभाजी महाराज उद्यानाच्या परिसराची सकाळी सात वाजता स्वच्छता केली. त्यानंतर रांगोळी काढून फुलांच्या माळांची सजावट करण्यात आली. स्मारकाच्या परिसरातील जुना भगवा ध्वज बदलून त्या ठिकाणी नवीन ध्वज लावण्यात आला.
उपस्थित शिवप्रेमींतर्फे दुग्धाभिषेक करण्यात आला. पुतळ्याला नवीन भगवा शेलाही घालण्यात आला. पुष्पहार घालून, प्रेरणामंत्राचे पठण करून संभाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. उपस्थितांना साखर व पेढे यांचे वाटप करण्यात आले.
सोशल डिस्टन्सिंग पाळून व तोंडाला मास्क लावून कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात संभाजीराजे यांची ३६३वी जयंती साजरी केली. यावेळी प्रतिष्ठानचे साताप्पा कडव, योगेश रोकडे, प्रवीण कुरणे, प्रफुल्ल भालेकर, विश्वास गंगाधर, संदीप पाडळकर, कुलदीप यादव, सुशांत शिंदे, सागर बोडेकर, बजरंग गावडे, आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले.संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजी बिग्रेडतर्फे अभिवादनछत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी रुईकर कॉलनी येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या सोहळ्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील प्रमुख उपस्थित होते.यानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पाटील म्हणाले, अनेक संकटांचा सामना करणारे छत्रपती संभाजी यांच्या चरित्रातून लढण्याचे बळ मिळते; तर संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी लॉकडाऊनच्या काळात गावोगावी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली.
यात सॅनिटायझर, मास्क यांचे वाटप करण्यात आले. गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी विकी जाधव, अभिजित भोसले, अभिजित कांझर, भगवान कोईगडे, संभाजी साळोखे, युवराज शिंदे, सागर पाटील, नीलेश सुतार, मदन परीट, आदी उपस्थित होते.