सेनापती कापशी : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कारखान्याचे संस्थापक, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शनाखाली अध्यक्ष व गोकूळचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नवीद मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांचा जनसेवेचा वारसा ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ चालवत आहेत. गोरगरिबांची सेवा व समाजकार्य करणे हेच शाहू महाराजांना अभिवादन ठरेल.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे, शेती अधिकारी प्रतापराव मोरबाळे, डिस्टलरी मॅनेजर, संतोष मोरबाळे, चीफ इंजिनियर हुसेन नदाफ, चीफ केमिस्ट मिलिंद चव्हाण, सर्व विभागाचे अधिकारी व कामगार उपस्थित होते.
२६ संताजी घोरपडे कारखाना
फोटो ओळी: बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना कार्यस्थळावर छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पूजन करताना कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, यावेळी जनरल मॅनेजर संजय घाटगे व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.