लोकोपयोगी व समाजाभिमुख काम असणाऱ्या श्रीपतराव बोंद्रेदादांच्या स्मृती जागवायच्या असतील, तर केएमटी अधिक सक्षमपणे लोकांच्या सेवेसाठी रुजू करण्यासाठी मी महानगरपालिकेकडे प्रयत्नशील राहीन, असे अभिषेक बोंद्रे यावेळी म्हणाले.
यावेळी कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त निखिल मोरे, सहायक अधिकारी चेतन कोंडे व प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, डॉ. सुहास बोंद्रे, कार्यकर्ते, केएमटीचे कामगार उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
शास्त्रीनगर येथील केएमटी वर्कशॉपमध्ये श्रीपतराव बोंद्रेदादांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना अभिषेक बोंद्रे, निखिल मोरे, चेतन कोंडे ,पी. एन. गुरव, पृथ्वीराज निकम व कर्मचारी.