कोल्हापूर : ढोलकीवादन, हार्मोनियम, लावणीगायन अशा सांगीतिक सादरीकरणाने मंगळवारी ढोलकीसम्राट यासीन म्हाब्री यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय साळोखे, जयप्रकाश परुशेकर, नीलम जाधव, बबिता काकडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यासीन म्हाब्री फौंडेशनच्या वतीने गायन समाज देवल क्लबच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ज. ल. नागावकर, सुभाष गुंदेशा, अमर मठपती, शिवकुमार हिरेमठ, इम्तियाज बारगीर, मिलिंद अष्टेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. हेमसुवर्णा मिरजकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुुरुवात झाली. गौतम राजहंस, अरुण शिंदे, अनिकेत ससाने, शंतनू कांबळे, सागर कांबळे यांनी एकल तबलावादन केले. त्यांना जयंत वायदंडे, स्वरूप दिवाण यांनी हार्मोनियम साथ केली. प्रभा गायकवाड, रजनी गोरड यांनी लावणी सादर केली. सिद्धराज पाटील, विठ्ठल कामण्णा यांचे गायन झाले.
यावेळी रमेश सुतार, नीलम मठपती, आसमा मिरजकर, वनिता दीक्षित, प्रभा गायकवाड, मीना पिसाळ, माधवी जाधव, लता सुतार, विजय दळवी, रामदास सुतार यांच्यासह श्रोते उपस्थित होते.
---
फोटो नं ०८१२२०२०-कोल-यासीन म्हाब्री पुरस्कार
ओळ : कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लब येथे यासीन म्हाब्री फौंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संजय साळोखे, जयप्रकाश परुशेकर, नीलम जाधव, बबिता काकडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवकुमार हिरेमठ, डॉ. ज. ल. नागावकर, सुभाष गुंदेशा, हेमसुवर्णा मिरजकर उपस्थित होत्या.
--
इंदुमती गणेश