बाळकृष्ण सातार्डेकर --रेडी--सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाच्या मुख्य केंद्रातील एक असणाऱ्या व आध्यात्मिक क्षेत्रातील मानाच्या मानल्या जाणाऱ्या रेडीकडे पर्यटकांचे पाय वळत आहेत. पावसाळी हंगाम उरकल्याने देशी पर्यटकांची वर्दळ रेडीकडे वाढत आहे. परंतु देशी-परदेशी पर्यटकांना अजूनही येथे पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने ते दिवसभराच्या पर्यटनानंतर सायंकाळी वास्तव्यासाठी नजीकच्या गोवा राज्याकडे वळतात. यासाठी येथील पर्यटनावर आधारित लहान-मोठे उद्योगधंदे उभारण्याकरिता शासन स्तरावर कृतीदर्शक प्रयत्न होण्याची गरज आहे. तर लोकप्रतिनिधींनीही यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील रेडी हे गाव कित्येक वर्षे मायनिंग व्यवसायासह पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. येथील जागृत व नवसाला पावणाऱ्या ग्रामदैवत स्वयंभू श्री देवी माउली देवस्थान, स्वयंभू द्विभुज महागणपती, समुद्रालगत असणारे सिद्धेश्वर मंदिर व येथील स्वच्छ, सुंदर रमणीय समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच येथील शिवकालीन हत्तीची सोंड, यशवंतगड किल्ला, पांडवकालीन हत्तीची सोंड, गुहा, जाते, कनयाळ येथील नारळ बागायतीतील हनुमान मंदिर, नवदुर्गा मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, साईबाबा मंदिर, श्री स्वामी समर्थांचे मंदिर, रेडी बंदर, रेडी व प्रवेशद्वारावर वसलेले सत्यपुरूष देवस्थानचे मंदिर पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. यामुळे देशी-विदेशी पर्यटकांची धार्मिक कार्यक्रमांसाठी रेडीलाच मोठी पसंती असते. घरातील विवाह, पूजा, यज्ञ आदी मुख्य कार्यक्रमानंतर आख्ख्या कुटुंबासोबत देवदर्शन आणि पर्यटनासाठी रेडीला देण्यात येणारी भेट म्हणजे कुटुंबासाठी पर्वणीच ठरत असते. पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्याने परदेशी पर्यटकांसह स्थानिकही आता मोठ्या उत्साहाने रेडीच्या पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी सहभागी होत आहेत. सध्या देवदर्शन व नैसर्गिक पर्यटनस्थळे पाहण्यासाठी रेडीमध्ये कोल्हापूर, पुणे, गडहिंग्लज, बेळगाव, कर्नाटक आदी भागातील देशी पर्यटकांची वर्दळ वाढायला सुरुवात झाली आहे. येथील सिंधुदुर्ग-रेडी किनारपट्टी म्हणजे निसर्गसौंदर्याने नटलेली खाण आहे. समुद्र किनाऱ्याची स्वच्छताही लक्ष वेधणारी आहे. या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या ग्रामस्थांना पाहून येथे येणारे पर्यटकही त्याचे अनुकरण करतात.रेडीतील पर्यटनविषयक उपाय पर्यटनासाठी रेडीतील बाजारपेठ ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, चोवीस तास वीज पुरवठा, अखंडित दूरध्वनी सेवा तसेच इंटरनेट सेवा, भ्रमणध्वनीच्या विविध कंपन्यांची टॉवर्सची सेवा, पर्यटनाबाबत माहिती देण्यासाठी मार्गदर्शक (गाईडस), रस्त्यानजीक दिशादर्शक व गतिरोधक फलक सेवा, समुद्रकिनारी स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, पॅराग्लायडिंग, लाईफ जॅकेट, सुरक्षारक्षक, गावामध्ये छोटेमोठे घरगुती भोजनालय, हॉटेल व्यवसाय, न्याहारी सुविधा लॉजिंग व एटीएम सेवा, जवळ चांगली बाजारपेठ, पर्यटनावर आधारित पंचतारांकित हॉटेल व्यवसाय, वाचनालयाची सुविधा, नैसर्गिक माहिती अशा प्रकारची पर्यटकांना सुखसुविधा मिळाल्यास पर्यटक येथेच वास्तव्य करतील व पर्यटन व्यवसाय तेजीमध्ये येईल. यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही येथे आवश्यक सोयीसुविधांच्या निर्र्मितीसाठी स्थानिकांना मदतीचा हात दिला तर येथे रोजगाराचे साधनही निर्माण होऊ शकते. तसेच पर्यटकांचीही उत्तम सोय होऊ शकते. ंंंंंंंंंंंंंंंसिंधुदुर्ग जिल्हा १७ वर्षांपूर्वी पर्यटन जिल्हा म्हणून संबोधित केला आहे. परंतु येथील पर्यटन व्यवसाय म्हणावा तसा वृध्दिंगत होऊ शकला नाही. यासाठी शासनस्तरावर पर्यटन व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी पायाभूत सुखसुविधा, पर्यटनावर आधारित मोठे उद्योगधंदे, स्थानिक युवकांना व्यावसायाभिमुख प्रशिक्षण, बँकांकडून उद्योग विस्तारासाठी कर्जसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. केरळ, गोवा राज्यांसारख्या धर्तीवर येथील पर्यटन व्यवसाय वृध्दिंगत होण्यासाठी रोजगाराच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास साधण्यासाठी ग्रामस्थांना आजही शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागत आहे. - किशोर वारखंडकर हॉटेल व्यावसायिक, रेडी-म्हारतळेवाडंंंंंंंंी
आध्यात्मिक ‘रेडी’कडे पर्यटकांचा वाढता कल
By admin | Published: November 03, 2015 9:37 PM