कोल्हापूर : जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांत सोमवारी ६१ उमेदवारांनी ८६ अर्ज दाखल केले. आतापर्यंत जिल्ह्यात १० जागांसाठी १३६ अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीच्या डाॅ. नंदाताई बाभूळकर, मानसिंग खोराटे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. दरम्यान, किमान पाच मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी अटळ असून त्याचा फैसला सोमवारी (दि. ४ नोव्हेंबर) होणार आहे.चंदगडमध्ये काँग्रेसचे गोपाळराव पाटील आणि अप्पी ऊर्फ श्रीशैल पाटील यांनी अर्ज दाखल केले असून, यातील एकजण रिंगणात राहणार आहे. हा बाभूळकर यांच्यासाठी धक्का आहे. खोराटे यांनीही शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. भाजपचे शिवाजीराव पाटील यांचा बंडखोरीचा निर्णय कायम आहे. राधानगरीमध्ये अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे.कोल्हापूर उत्तरमधून वैशाली राजेश क्षीरसागर यांनीही अर्ज दाखल केला असून भाजपचे अजित ठाणेकर यांनी भरलेला अपक्ष अर्ज चर्चेचा विषय ठरला. शाहूवाडी मतदारसंघातून सत्यजित पाटील यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनीही अर्ज दाखल केला असून हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांनीही सोमवारी अर्ज दाखल केले. इचलकरंजीमधून माजी आमदार अशोक जांभळे यांचे चिरंजीव सुहास यांनीही अर्ज दाखल केला असून, शिरोळमधून शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह स्वरूपा राजेंद्र यड्रावकर यांनी अर्ज दाखल केला.चंदगड
- गोपाळराव मारुतराव पाटील, अपक्ष
- नंदिनी बाभूळकर कुपेकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
- आण्णासाहेब ऊर्फ श्रीशैल विनायक पाटील, अपक्ष
- शिवाजी शातुप्पा पाटील, अपक्ष
- अप्पी ऊर्फ विनायक गोविंदराव पाटील, अपक्ष
- मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष
- सुश्मिता राजेश पाटील, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष
- राजेश नरसिंगराव पाटील, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष
- नंदिनी बाभूळकर कुपेकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
- आकाश एकनाथ डवरी, अपक्ष
- मनीषा मानसिंग खोराटे, अपक्ष
- मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष
- मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष
- श्रीकांत अर्जुन कांबळे, बहुजन समाज पक्ष
- प्रकाश आनंदराव आबिटकर शिंदेसेना
- रणजितसिंग कृष्णराव पाटील, अपक्ष
- राजेंद्र यशवंत ऊर्फ आर. वाय. पाटील, अपक्ष
- आनंदराव यशवंत ऊर्फ ए. वाय. पाटील, अपक्ष
कागल
- अजित भारत निकम, अपक्ष
- अश्विन अर्जुन भुजंग, अपक्ष
- हसन मियालाल मुश्रीफ, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष
- नावीद हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष
कोल्हापूर दक्षिण
- प्रकाश बापू शेळके, अपक्ष
- सलीम नूरमहम्मद बागवान, अपक्ष
- सुप्रिया प्रकाश लाखे, अपक्ष
- विशाल केरू सरगर, अपक्ष
- सुरेश सायबू आठवले, बहुजन समाज पक्ष
- जयश्री विलास बनसोडे, अपक्ष
- विश्वास रामचंद्र तरटे, रिपब्लिकन पक्ष (ए)
करवीर
- विष्णू पांडुरंग गायकवाड, अपक्ष
- माणिक बाबू शिंदे, अपक्ष
- कृष्णाबाई दीपक चौगुले, अपक्ष
- अजित सुलभा दत्तात्रय ठाणेदार, भारतीय जनता पक्ष
- चंद्रशेखर श्रीराम म्हस्के, अपक्ष
- अरविंद्र भिवा माने, अपक्ष
- राजेश विनायक क्षीरसागर, शिंदेसेना
- रूपा प्रवीण वायदंडे, रिपब्लिकन पक्ष इंडिया (अ.)
- वैशाली राजेश क्षीरसागर, अपक्ष
शाहूवाडी
- संतोष केरबा खोत, कामगार किसान पक्ष
- बाबासो यशवंतराव पाटील, अपक्ष
- सत्यजित विलासराव पाटील, अपक्ष
- आनंदराव वसंतराव सरनाईक, संभाजी ब्रिगेड पक्ष
- आनंदराव वसंतराव सरनाईक, अपक्ष
- विनय विजय चव्हाण, अपक्ष
- विनय विष्णू कोरगावकर, अपक्ष
- विनय विलास कोरे, जनसुराज्य शक्ती पक्ष
हातकणंगले
- प्रदीप भीमसेन कांबळे, अपक्ष
- गणेश विलास वायकर, रिपब्लिकन पक्ष (A)
- वैभव शंकर कांबळे, अपक्ष
- इंद्रजित आप्पासाहेब कांबळे, अपक्ष
- सुजित वसंतराव मिणचेकर, अपक्ष
- अशोकराव कोंडीराम माने, जनसुराज्य शक्ती पक्ष
इचलकरंजी
- सचिन किरण बेलेकर, राष्ट्रीय समाज पक्ष
- अभिषेक आदगोंडा पाटील, अपक्ष
- आरती रमेश माने, अपक्ष
- सुहास अशोकराव जांभळे, अपक्ष
- राहुल प्रकाश आवाडे, भारतीय जनता पक्ष
- रवी विठ्ठल पाटोळे, अपक्ष
शिरोळ
- आदम बाबू मुजावर, अपक्ष
- स्वरूपा राजेंद्र पाटील, राजर्षी शाहू विकास आघाडी
- विश्वजीत पांडुरंग कांबळे, रिपब्लिकन सेना
- शीला श्रीकांत हेगडे, अपक्ष
- उल्हास संभाजी पाटील, अपक्ष
- आरिफ महमदअली पटेल, वंचित बहुजन आघाडी