शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

‘स्वयंम्’च्या २५ मुलांचे पालकत्व दातृत्वाचा ओघ : ‘लोकमत’मधील वृत्तानंतर भरभरुन प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:06 AM

गतिमंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणाऱ्या ‘स्वयंम्’ या विशेष मुलांच्या शाळेतील २५ गतिमंद मुलांचे एका वर्षासाठीचे पालकत्व समाजातील

कोल्हापूर : गतिमंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणाऱ्या ‘स्वयंम्’ या विशेष मुलांच्या शाळेतील २५ गतिमंद मुलांचे एका वर्षासाठीचे पालकत्व समाजातील दानशूरांनी स्वीकारले आहे. ‘लोकमत’ मध्ये त्यासंबंधीचे वृत्त प्रकाशित झाले होते व समाजाच्या दातृत्वाला आवाहन करण्यात आले होते. त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

कसबा बावड्यातील न्याय संकुलाच्या मागील बाजूस इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने स्वयंम् विशेष गतिमंद मुलांची शाळा चालवली जाते. येथे सध्या १४५ मुले-मुली शिक्षण घेत असून या शाळेला केवळ ४० विद्यार्थ्यांसाठी अनुदान दिले जाते. उर्वरित १०४ विद्यार्थ्यांचा खर्चाचा डोलारा दानशूर व पदाधिकाºयांच्या मदतीवर सांभाळला जातोय; मात्र वाढत्या विद्यार्थीसंख्येमुळे व्यवस्थापनाला शाळेचा खर्च भागवणे अवघड जात आहे; त्यामुळे शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली असून याद्वारे दानशूर व्यक्तीने केवळ पाच हजार रुपये भरून एका विद्यार्थ्याचे एका वर्षासाठीचे आर्थिक पालकत्व स्वीकारायचे आहे. याबाबतचे वृत्त २५ जूनला ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले.

‘लोकमत’ने आणि संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्याचदिवशी कोल्हापुरातील आठ दानशूर व्यक्ती व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या योजनेत सक्रिय सहभाग नोंदवला. गेल्या पंधरा दिवसांत अनेक नागरिकांनी, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटना, रोटरी क्लबचे पदाधिकारी, तरुणांचे ग्रुप, उद्योजक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शाळेला भेट देऊन अर्थसाहाय्य केले आहे. अशारितीने जवळ २५ मुलांसाठीचे अर्थसाहाय्य संस्थेला मिळाले आहे. अजूनही नागरिकांकडून या योजनेची विचारणा होते, शाळेची माहिती घेऊन आम्ही शक्य तितकी मदत करून अशी ग्वाही येत आहे. शिवाय कुटुंबीयांचे वाढदिवस, लहान-मोठे कार्यक्रम विद्यार्थ्यांसमवेत करण्याचीही इच्छा अनेकांनी व्यक्त केली.

निखळ मैत्री परिवाराचा पुढाकार‘लोकमत’मधील बातमी वाचून निखळ मैत्री परिवार या ग्रुपने ‘लोकमत’शी संपर्क साधून शाळेला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रुपमधील सदस्यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन तेथील काम पाहिले. शाळेला अधिकाधिक अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी या संस्थेच्यावतीने शाळेवर विशेष व्हिडिओ तयार केला आहे. तो फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणार आहे. त्याद्वारे अनेक दानशूर व्यक्ती शाळेशी जोडल्या जाणार आहेत. या संस्थेचा सोमवारी (दि. १६) शाहू स्मारक भवनात सायंकाळी सहा वाजता गाण्याचा कार्यक्रम असून, त्यादिवशी ग्रूपमधील सदस्यांकडून तीन ते चार विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले जाणार आहे. सरदार पाटील, किरण रणदिवे, मनोज सोरप, विजय तांबे, दिलीप अहुजा हे या ग्रूपचे अ‍ॅडमिन आहेत. ज्या दानशूर व्यक्तींना शाळेला मदत करायची आहे, ते या कार्यक्रमास हजर राहून मदतनिधी देऊ शकतात. 

गतिमंद मुलांच्या मदतीसाठी ‘लोकमत’ने आवाहन केले त्यामुळे अनेक दानशूर व्यक्ती संस्थेशी जोडले गेले आहेत. २५ गतिमंद मुलांंसाठी अर्थसाहाय्य मिळाले आहे. याबद्दल संस्थेच्यावतीने आम्ही ‘लोकमत’चे खूप आभारी आहे.- अमरदीप पाटील, उपाध्यक्ष इंडियन रेडक्रॉस सोसायटी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocialसामाजिक