तुरंबे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील गुढीपाडव्याला होणारी महालक्ष्मीची व गहिनीनाथ यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासन आणि यात्रा कमिटीने घेतला आहे. ग्रामस्थांनी यात्रा करू नये, असे आवाहन प्रभारी सरपंच शिवाजी मगदूम यांनी केले आहे.
तुरंबेची गहिनीनाथ व महालक्ष्मीची यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू होते. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यात्रा काळात होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम साधेपणाने व शासनाच्या नियमांचे पालन करून करण्याचे आव्हान सरपंच शिवाजी मगदूम यांनी केले आहे. गावातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी प्रबोधन प्रशासन करत आहे. गावात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे पिण्याच्या पाण्याची टाकीची स्वच्छता सदस्यांनी केली. यावेळी शामराव भावके, विजय बलुगडे, सुरेश देवर्डेकर, विश्वनाथ तहसीलदार, बबन देवर्डेकर, ग्रामपंचायत सदस्य अजित खोत, संभाजी भोईटे अविनाश चिंदगे, ग्राम विकास अधिकारी युवराज कांबळे तलाठी रूपाली भांदीगरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.