कोल्हापूर : येथील न्यू पॉलिटेक्निक तर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमातून करिअर मार्गदर्शन ऑनलाईन वेबिनार रविवारी आणि सोमवारी घेण्यात आला. त्यामध्ये प्रा. राजेंद्र ढवळे, प्रा. डॉ. विनायक दिवाण, अभिजीत वालवाडकर, बाजीराव राजीगरे, रवी पाईकराव यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमासह ते पूर्ण केल्यानंतर असलेल्या नोकरी, व्यवसायाच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया आणि विविध फ्रीशीप, स्कॉलरशिप योजनांची माहिती देण्यात आली. पालकांच्या वतीने श्री. केळुसकर, मोमीन यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी उचगाव येथील न्यू पॉलिटेक्निक किंवा कोल्हापूर शहरातील न्यू कॉलेज येथील सुविधा केंद्रास भेट देऊन त्यांचा अर्ज शुक्रवार (दि. ३०) पूर्वी निश्चित करावा, असे आवाहन न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य विनय शिंदे यांनी केले.