शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

गनिमी काव्याचे राजकारण करणार : सतेज पाटील यांची राजकीय टोलेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 11:44 AM

राधानगरी रोड वरील इराणी खणीनजीकच्या चौकात उभारण्यात आलेल्या हातात तलवार धरलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे स्मृती स्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. 

ठळक मुद्देगनिमी काव्याचे राजकारण करणार : सतेज पाटील यांची राजकीय टोलेबाजीसरसेनापती संताजी घोरपडे स्मृती स्तंभाचा लोकार्पण सोहळा संपन्न

कळंबा : हिंदवी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी तसेच शत्रूला नामोहरम करण्यासाठी संताजी घोरपडे यांनी गनिमीकावा युध्द पद्धत वापरली. येत्या काळात आपणही जिल्ह्यात गनिमी काव्याचे राजकारण करणार हे निश्चित असून संताजी-धनाजीची धास्ती घेतलेल्या मोगलांप्रमाणे राजकीय शत्रूंना आता सर्वत्र आम्हीच दिसत आहोत अशी राजकीय टोलेबाजी आमदार सतेज पाटील यांनी केली.

राधानगरी रोड वरील इराणी खणीनजीकच्या चौकात उभारलेल्या  सरसेनापती संताजी घोरपडे स्मृती स्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. संताजी घोरपडे यांच्या स्तंभाच्या उभारणीमुळे त्यांच्या कार्याच्या प्रेरणादायी इतिहासास उजाळा मिळाला असून त्यांच्या शौर्याचा आदर्श युवा पिढीस मार्गदर्शक ठरेल असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.संताजी घोरपडे यांचे वंशज उदयसिंह घोरपडे यांनी श्रेष्ठ सेनानीच्या कार्याचा यथार्थ गौरव झाल्याचे मत व्यक्त केले. इतिकासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या शौर्याचा इतिहास यावेळी विशद केला.प्रास्ताविक किरण पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी केले. यावेळी महापौर माधवी गवंडी, उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेविका दीपा मगदूम, प्रतीक्षा पाटील, नगरसेवक अभिजित चव्हाण, तौफिक मुल्लानी, अर्जुन माने यांसह मधुकर रामाने, वसंतराव देशमुख, प्रमिला देशमुख यांसह मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील