शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

गुंड स्वप्नील तहसीलदार टोळीकडून दोघांवर सशस्त्र जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

By उद्धव गोडसे | Published: September 13, 2023 4:38 PM

यावेळी १५ ते २० जणांनी तलवारी, एडके नाचवत परिसरात दहशत माजवली

कोल्हापूर : गुंड स्वप्नील तहसीलदार आणि त्याचा भाऊ सागर या दोघांसह त्यांच्या टोळीतील १५ ते २० जणांनी पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून मुक्त सैनिक वसाहतीत सशस्त्र पाठलाग करून दोघांवर जीवघेणा हल्ला केला. मंगळवारी (दि. १२) रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान झालेल्या हल्ल्यात अभिषेक नामदेव पाटोळे (वय २३) आणि करण संजय बनसोडे (वय २५, दोघे रा. चांदणे नगर, रुईकर कॉलनी, कोल्हापूर) हे दोघे गंभीर जखमी झाले.

तलवारी नाचवत आणि पिस्तुलाचा धाक दाखवत गुंडांनी धुमाकूळ घातल्याने परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली होती. याप्रकरणी गुंड स्वप्नील संजय तहसीलदार (वय ४५), सागर संजय तहसीलदार आणि अमित धोंदरे या तिघांना पोलिसांनी अटक केली.शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक पाटोळे याने तीन वर्षांपूर्वी गुंड स्वप्नील तहसीलदार याच्या टोळीतील हेमंत नावाच्या तरुणाला मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून तहसीलदार टोळी अभिषेकच्या मागावर होती. मंगळवारी रात्री मुक्त सैनिक वसाहतीमधील वालावलकर हायस्कूलजवळ भावाच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने अभिषेक हा करण बनसोडे या मित्राला सोबत घेऊन पेट्रोल देण्यासाठी दुचाकीवरून गेला.

पेट्रोल दिल्यानंतर रस्त्याकडेला थांबलेला अभिषेक हा सागर तहसीलदार याच्या नजरेस पडला. त्याने भाऊ स्वप्नील याच्यासह इतरांना बोलवून घेतले. त्यांनी अभिषेक आणि करण या दोघांना जातीवाचक शिवीगाळ करीत काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पळून जाणा-या दोघांचा पाठलाग करून मारले. यावेळी १५ ते २० जणांनी तलवारी, एडके नाचवत परिसरात दहशत माजवली.माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला. जखमी पाटोळे याच्या फिर्यादीनुसार गुंड तहसीलदार बंधूंसह १५ ते २० जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, दहशत माजवणे, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचा गैरवापर करणे आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बुधवारी सकाळी तिघांना अटक केली. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस