शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
3
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
4
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
5
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
6
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
7
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
8
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
9
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
10
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
11
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
12
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
13
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
14
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
15
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
16
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
17
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
18
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
19
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
20
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

गुंडूराव कांबळेला पोलिस कोठडी

By admin | Published: February 07, 2017 11:56 PM

विनयभंगप्रकरणी न्यायालयात हजर

चंदगड : कॉलेजमधील युवतींना अश्लील मेसेज आणि दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी निर्भया पथकाने चंदगड पोलिसांत दीड महिन्यापूर्वी प्रा. गुंडू कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. मात्र, तो दीड महिन्यापूर्वी फरार होता. मंगळवारी तो स्वत:हून चंदगड न्यायालयात हजर झाला. त्याला न्यायाधीश एम. डी. ठोंबरे यांनी १० फेब्रुवारीअखेर पोलिस कोठडी सुनावली.अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्याने पहिला अर्ज गडहिंग्लज येथील न्यायालयात दाखल केले होता. मात्र, न्यायाधीश देशमुख यांनी तो फेटाळला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे कांबळे याला हजर झाल्याशिवाय पर्याय नसल्याने तो मंगळवारी चंदगड न्यायालयात हजर झाला.कांबळे न्यायालयात हजर झाल्याची वार्ता तालुक्यात पसरताच लोकांचा संतप्त जमाव न्यायालयासमोर जमला. यावेळी कांबळे याच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देऊन तोंडाला काळे फासण्याचा जमावाने प्रयत्न केला. मात्र, पोलिस बंदोबस्त मोठा असल्याने तो यशस्वी झाला नाही.जमाव पाटील यांच्या मागे लागल्याने पोलिसांनी त्याला अक्षरश: पळवतच पोलिस ठाण्यात नेले. (प्रतिनिधी)चंदगड न्यायालयात पोलिस ठाण्याकडे आरोपी गुंडूराव कांबळे याला नेताना पोलिस.