शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

अंबाबाई मंदिराच्या मनकर्णिका कुंडात पुरातन वस्तू ,केंद्रीय पुरातत्त्वची मदत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:41 PM

Mahalaxmi Temple Kolhapur-जर्मन बनावटीची बंदूक, पुंगळ्या, तांब्याचे शिवलिंग, घड्याळ, नाणी, काचेचे कंदील, कोरीव दगड, कृष्ण, शिवलिंग, अश्वारूढ पार्वती, अन्नपूर्णादेवी अशा देवतांच्या मूर्ती, वीरगळ. तांबे व कास्याची भांडी, तांब्या, मापटे, बॅटरी अशा अनेकविध पुरातन वस्तू मनकर्णिका कुंडाच्या गर्भातून बाहेर निघाल्या आहेत. अंबाबाई मंदिराच्या आवारात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने याच्या उत्खननाचे काम सध्या सुरू असून पाण्याचे जिवंत झरे सापडण्यासाठी आणखी १३ फुटांपर्यंत खोदाई करण्यात येणार आहे. पुढील दीड महिन्यात कुंडाचे मूळ रूप प्रकाशात येईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमनकर्णिकेच्या गर्भात सापडल्या पुरातन वस्तूबंदूक, देवतांच्या मूर्ती, वीरगळ, भांडी, नाणी प्रकाशात

कोल्हापूर : जर्मन बनावटीची बंदूक, पुंगळ्या, तांब्याचे शिवलिंग, घड्याळ, नाणी, काचेचे कंदील, कोरीव दगड, कृष्ण, शिवलिंग, अश्वारूढ पार्वती, अन्नपूर्णादेवी अशा देवतांच्या मूर्ती, वीरगळ. तांबे व कास्याची भांडी, तांब्या, मापटे, बॅटरी अशा अनेकविध पुरातन वस्तू मनकर्णिका कुंडाच्या गर्भातून बाहेर निघाल्या आहेत.  उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, भूकंप, अतिवृष्टी असे वातावरणीय बदल झेलूनही हजारो वर्षे टिकून राहिलेल्या अंबाबाई मंदिराचे सेन्सर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. याशिवाय वास्तू व शिल्पांचे जतन संवर्धन, नूतनीकरण, सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व खात्याची मदत घेणार असल्याची माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. छतावरील कोबा काढण्यासाठी पुरातत्त्व खात्याचे मार्गदर्शन घेणार असल्याचे अमरजा निंबाळकर यांनी सांगितले.

अंबाबाई मंदिराच्या आवारात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने याच्या उत्खननाचे काम सध्या सुरू असून पाण्याचे जिवंत झरे सापडण्यासाठी आणखी १३ फुटांपर्यंत खोदाई करण्यात येणार आहे. पुढील दीड महिन्यात कुंडाचे मूळ रूप प्रकाशात येईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी  पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, अभियंता सुयश पाटील, मंदिर व मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर, पुरातत्त्व खात्याचे उत्तम कांबळे, नियंत्रण कक्षाचे राहुल जगताप, अभिजीत पाटील उपस्थित होते.ते म्हणाले, सध्या कुंडाची २७ फुटांपर्यंतची खोदाई झाली असून आणखी १३ फुटांपर्यंत खोदाई होण्याची शक्यात आहे. या खोदाईदरम्यान कुंडाच्या आवारात शिवलिंगाची लहान मंदिरे, ओवऱ्या, वीरगळ या वास्तू प्रकाशात आल्या आहेत. तर तांबे, पितळ, कास्याचे तांबे, बादली, मापटे, बंदुकीच्या पुढची नळी, तांब्याचे पुंगळे, टाक, नाणी, कोरीव दगड असे अनेक साहित्य मिळाले आहे. त्या साहित्याची त्या त्या दिवशी नोंद करून ते सुरक्षित ठेवण्यात आले आहे. खोदाई पूर्ण झाल्यावर कुंडाची डागडुजी व सुधारणा करून कुंडाचे मूळ स्वरूप प्रकाशात आणले जाईल. 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरMahesh Jadhavमहेश जाधवReligious Placesधार्मिक स्थळे