कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवातील अत्यंत महत्वाचा दिवस असलेल्या अष्टमीनिमित्त गुरूवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई वाहनात विराजमान होवून नगरप्रदक्षिणेला निघणार आहे. रात्री बारानंतर महाकाली मंदिरासमोर अष्टमीची महापूजा होईल.दुर्गेने अष्टमीच्यादिवशी महिषासूराचा वध केला त्यामुळे हा दिवस नवरात्रौत्सवात अत्यंत महत्वाचा मानला जातो. या दिवशी अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रुपात पूजा बांधली जाते.रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाई आपल्या शाही लव्याजम्यानिशी फुलांनी सजविलेल्या वाहनातून नगरवासीयांच्या भेटीला निघेल. महाद्वार, गुजरीमार्गे भवानी मंडपात येऊन येथे शक्तिपीठातील देवता असलेल्या तुळजाभवानी देवीची भेट घेईल. येथे देवीची आरती झाल्यानंतर गुरुमहाराजांच्या वाड्याकडे प्रस्थान करील.येथून बिनखांबी गणेश मंदिरमार्गे पुन्हा महाद्वारात येऊन देवीची उत्सवमूर्ती गरुडमंडपात विराजमान होईल. येथे सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर मूर्ती पुन्हा गाभाºयात जाईल. रात्री बारा वाजता मंदिराचे सर्व दरवाजे बंद केले जातील. त्यानंतर महाकालीसमोर अंबाबाईचा जागराचा होम चालेल.बाजारपेठेत गर्दीअष्टमीच्या जागरासाठी घरोघरी तुळजाभवानीचा चौक मांडला जातो. या चौकासाठी ऊस, जोंधळ्याची धाटे, झेंडूची फुले यांना मागणी वाढली आहे. शहरातील बिंदू चौक, गुजरी, जोतिबा रोड, ताराबाई रोड, बिनखांबी गणेश मंदिर परिसर या भागात अष्टमी आणि खंडेनवमीच्या पूजेसाठी लागणाºया साहित्यखरेदीसाठी बुधवारी दिवसभर गर्दी झाली. तसेच खंडेनवमीनिमित्त घरगुती शस्त्रपूजन, व्यवसायासाठी वापरण्यात येणारी उपकरणे यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. यासाठी लव्हाळ्याच्या खरेदीलाही मागणी वाढली आहे.शुक्रवारी मंदिर नऊ वाजता उघडणार..गुरूवारी रात्रभर जागराचा होम असल्याने अंबाबाई मंदिर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता उघडण्यात येईल. त्यानंतर देवीचा पहिला अभिषेक व दुपारची आरती होईल.
अंबाबाईची गुरूवारी नगरप्रदक्षिणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 3:28 PM
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवातील अत्यंत महत्वाचा दिवस असलेल्या अष्टमीनिमित्त गुरूवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई वाहनात विराजमान होवून नगरप्रदक्षिणेला निघणार आहे. रात्री बारानंतर महाकाली मंदिरासमोर अष्टमीची महापूजा होईल.दुर्गेने अष्टमीच्यादिवशी महिषासूराचा वध केला त्यामुळे हा दिवस नवरात्रौत्सवात अत्यंत महत्वाचा मानला जातो. या दिवशी अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रुपात पूजा बांधली जाते.रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या ...
ठळक मुद्देगुरूवारी रात्री अष्टमीचा जागररात्री बारानंतर महाकाली मंदिरासमोर अष्टमीची महापूजाअष्टमीच्यादिवशी अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रुपात पूजा लव्हाळ्याच्या खरेदीलाही मागणी शुक्रवारी मंदिर नऊ वाजता उघडणार