कोल्हापूर : राज्यात गुटखा बंदी असताना विक्रीच्या उद्देशाने साठा करून ठेवलेला सुमारे २ लाख १३ हजार ९९७ रुपये किमतीचा गुटखा, तंबाखूजन्य सुगंधी पानमसाला पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शनिवारी दुपारी इचलकरंजीतील जुना चंदूर रोडवरील तनगे मळा येथे केली. कारवाईत पोलिसांनी राजेंद्र जंबू जकाते (वय ४६ रा. जुना चंदूररोड, तनगे मळा) याला अटक केली.
पोलिसानी दिलेली माहीती अशी की, राज्यात गुटखा बंदी आहे. तनगे मळा येथे जकाते यांच्या घरी विविध बारा कंपनीचा सुगंधी तंबाखूजन्य पान मसाला, गुटखासाठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वषेण पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी दुपारी छापा टाकला असता त्यांच्या घरी सुमारे २ लाख १३ हजार रुपये किमतीचा सुगंधी पानमसाला व जर्दा तंबाखू तत्सम गुटखाजन्य पदार्थाचा साठा विक्रीकरिता आणल्याचे मिळून आले. तो साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी राजेंद्र जकाते याला अटक करण्यात आली.
फोटो नं.०४०९२०२१-कोल-गुटखा
ओळ : इचलकरंजीत जुना चंदूर रोडवरील तनगे मळ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शनिवारी दुपारी छापा टाकून जप्त केलेला गुटख्याचा साठा.
फोटो नं.०४०९२०२१-कोल- राजेंद्र जकाते (आरोपी गुटखा)
040921\04kol_4_04092021_5.jpg
फोटो नं.०४०९२०२१-कोल-गुटखाओळ : इचलकरंजीत जुना चंदूररोडवरील तनगे मळ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शनिवारी दुपारी छापा टाकून जप्त केलेला गुटख्याचा साठा.फोटो नं.०४०९२०२१-कोल- राजेंद्र जकाते (आरोपी गुटखा)