शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोल्हापुरात तावडे हॉटेलजवळ सव्वादोन लाखांचा गुटखा पकडला; तिघांना अटक, कार जप्त

By उद्धव गोडसे | Published: January 20, 2024 7:22 PM

कोल्हापूर : कर्नाटकातून आणलेला दोन लाख ३४ हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी साताऱ्याच्या दिशेने घेऊन जाणारी कार अडवून ...

कोल्हापूर : कर्नाटकातून आणलेला दोन लाख ३४ हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी साताऱ्याच्या दिशेने घेऊन जाणारी कार अडवून पोलिसांनी गुटखा आणि कार असा सात लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. पुणे-बंगळुरू महामार्गावर तावडे हाॅटेल येथे गुरूवारी (दि. १८) रात्री ही कारवाई झाली. प्रसाद दत्तात्रय देसाई (वय २९), किरण आनंदा पोवार (वय ३०) आणि सूरजीत जयवंत घोरपडे (वय २५, तिघेही रा. शिवाजीनगर, हुपरी, ता. हातकणंगले) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून गुटखा आणि सुगंधी पान सुपारीची अवैध वाहतूक होणार असल्याचे समजले होते. त्यानुसार उपनिरीक्षक विनायक सपाटे यांच्या पथकाने तावडे हाॅटेल येथील सेवा रस्त्यावर सापळा रचून संशयित कार (एमएच ०२, ईई १०६९) पकडली. कारची झडती घेतली असता, त्यामध्ये दोन लाख ३४ हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी सापडली. गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कारसह गुटखा जप्त केला. कर्नाटकातून आणलेला गुटखा पुणे-बंगळुरू महामार्गावर दुसऱ्या व्यक्तीला पोहोचवायचा होता, अशी माहिती अटकेतील संशयितांनी पोलिसांना दिली. तिन्ही संशयितांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. न्यायालयात हजर केले असता, तिघांना मंगळवारपर्यंत (दि. २३) पोलिस कोठडी मिळाली.

उपनिरीक्षक सपाटे यांच्यासह पोलिस अंमलदार विलास किरोळकर, संजय हुंबे, कृष्णात पिंगळे, संजय पडवळ, सागर चौगुले, संतोष पाटील, किरण शिंदे आणि संतोष बरगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक शेषराज मोरे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी