नियोजनाचा अभाव आणि गटारात साचलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे गटारे तुंबलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे यापूर्वीच्या प्रत्येक ग्रामसभेत गटारी स्वच्छतेचा विषय चांगला रंगत होता. दगड-गोठे, माती, कचरा गटारात अडकल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर पसरत असल्याने गावातील काही गल्ली-बोळात रस्तेच होते.परिणामी गल्ली बोळ्यातील रस्ते नादुरुस्त झाले आहेत. शिवाय पावसाळ्यातील पाण्याच्या निचऱ्याच्या आवश्यकतेनुसार गटाराची बांधणी न झाल्यामुळे पावसाळ्यात गटारीचे पाणी उलटून घरात शिरून नुकसान झाले आहे.
महिन्यापासून तुंबलेल्या गटारी साफ करण्याचे काम सुरू आहे. शंभर ट्राल्यांच्यावरती गटारीतून गाळ आणि कचरा काढण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेबाबत ग्रामस्थ आणि महिल्यांच्यातून कौतुक होत आहे.