सितम सोनवणे , लातूरलातूर जिल्हा परिषदेअंतर्गत ‘स्वच्छ भारत मिशन’साठी शौचालय बांधणीचे २०१५-१६ चे महाराष्ट्र राज्याने नवीन ४८ हजार ७६२ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट दिले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी स्वच्छ भारत मिशनपुढे नवे आव्हान आले असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पाणीटंचाई, उपलब्ध निधी आदी समस्यांवर मात करण्याची कसरत करावी लागणार आहे. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबविले आहे. या मिशनअंतर्गत २०१४-१५ अंतर्गत २६ हजार २२८ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. यामुळे लातूर जिल्ह्यात शौचालय बांधणीला गती मिळाली आहे. ग्रामीण भागात वैयक्तिक कुटुंब शौचालय बांधणी, दोन खड्ड्यांचे शौचालय बांधकाम यासाठी दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंब व दारिद्र्यरेषेवरील अल्पभूधारक शेतकरी, घर असलेले भूमिहीन शेतमजूर, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि महिला कुटुंब प्रमुख, अनुसूचित जाती जमाती असलेले कुटुंब यांना वैयक्तिक स्वच्छतागृह बांधून वापर सुरू केल्यास १२ हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. या कारणामुळे ग्रामीण भागातील असंख्य कुटुंब शौचालय बांधणीत पुढाकार घेत आहेत. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव करण्यात स्वच्छता विभाग यशस्वी होत आहे. हे जरी सत्य असले, तरी २०१५-१६ साली शासनाच्या वतीने देण्यात आलेले ४८ हजार ७६२ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट स्वच्छता विभागापुढे नवे आव्हान ठरणार आहे. पाणीटंचाई तसेच यापूर्वी शौचालयाचे बांधकाम करूनही ज्यांना अनुदान प्राप्त झाले नसल्याने पुढील उद्दिष्ट पूर्तीसाठी सामोरे जावे लागणार आहे.
हा तर पी. एन. पाटील यांचा अपरिपक्वपणा
By admin | Published: April 16, 2015 12:52 AM