पंचवीस-तीस माकडांच्या कळपाने गावाशेजारील आमणगी, रामाणे, भोईटे बारी नावाच्या शेतात तसेच गुरव माळात अक्षरशः हैदोस घातला आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या भुईमूग पिकांचे मोठमोठे वाफे उपसून टाकले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक माकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत फस्त करत आहेत, हे पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवसा माकडे आणि रात्री रानडुक्कर, गवा व इतर वन्यप्राण्यांकडून भुईमूग, भात, ऊस, नाचना पिकांचे नुकसान होत आहे. बंडेराव भोईटे, दत्तात्रय भोईटे, बंडेराव गुरव, श्यामराव गुरव, संतोष पाथरवट, बाबासाहेब भोईटे, दिनकर ढेकळे, पांडुरंग ढेकळे यांच्या शेतात माकडांनी भुईमूग पिकांचे नुकसान केले आहे. वनविभागाच्या वतीने या माकडांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा तसेच नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
फोटो दिंडेवाडी येथील गावाशेजारील शिवारात माकडाने हैदोस घालून भुईमूग पिकांचे केलेले नुकसान केले आहे.