कोल्हापूर : महापालिकेकडून शहरातील अतिक्रमणावर ८ फेब्रुवारीपासून मोठी कारवाई केली जाणार आहे. मंदिरे, हॉस्पिटलच्या १०० मीटर परिसरातील अतिक्रमणावर हातोडा टाकला जाणार आहे. त्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे.शहरातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. महापालिका कारवाई करण्यास गेल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे कारवाईला मर्यादा येत होत्या. आता महापालिकेवर प्रशासकराज असल्यामुळे प्रशासनाकडून ओपन स्पेसवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
आता शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली जाणार आहे. महापालिका प्रशासनाकडून ८ फेब्रुवारीपासून अतिक्रमण कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये दुकानदार, व्यावसायिक, फेरीवाले यांच्याकडून होत असलेल्या अतिक्रमणावरही कारवाई केली जाणार आहे.केबिन जप्त होणारइस्टेट विभागाने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. ७०० फेरीवाल्यांनी कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदतही संपली आहे. जे फेरीवाले अनधिकृत केबिन लावून व्यवसाय करतात, अशा सर्व फेरीवाल्यांची केबिन जप्त करण्यात येणार आहे. संबंधितांना ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.