शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

एकेका मतासाठी हाता-पाया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2015 1:10 AM

महापालिकेसाठी निकराची झुंज : ‘मतदार राजा’ला केंद्रापर्यंत आणण्यासाठी रिक्षा, आलिशान कारचा वापर

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच ८१ प्रभागांत अस्तित्वाची व प्रतिष्ठेची लढाई झाल्याने रविवारी मतदानादिवशी एका-एका मतासाठी उमेदवार शेवटपर्यंत झुंजताना दिसत होते. निवडणुकीत साम, दाम, दंडाचा सर्रास वापर झाल्याने आपण लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्या की नाही, यावर उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांच्याही नजरा होत्या. आपल्या संपर्कातील उमेदवार मतदान केंद्रावर जाईपर्यंत त्याच्यावर उमेदवाराची नजर राहिल्याने तणावाचे वातावरण पाहावयास मिळाले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-ताराराणी आघाडी व शिवसेना हे प्रमुख चार पक्ष ताकदीने रिंंगणात उतरल्याने सर्वच प्रभागांत चुरशीने मतदान झाले. येईल त्या उमेदवाराला ‘मी तुमचाच’ अशीच भूमिका मतदारांनी घेतली. सर्व प्रकारचा वापर करूनही मतदारांचा शेवटपर्यंत अंदाज आला नसल्याने उमेदवार अधांतरीच राहिले. आॅक्टोबर हिटच्या तडाख्याचा अंदाज घेऊन मतदारांनी सकाळी लवकरच मतदान केंद्रांवर हजेरी लावली. बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासूनच गर्दी दिसत होती. दहा वाजता तर एकदमच गर्दी उसळल्याने मतदान केंद्रांबाहेर रांगाच लागल्या होत्या. मतदान करण्याचे आश्वासन दिलेल्या मतदारांकडे उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांच्या नजरा होत्या. मतदान करून बाहेर आल्यानंतर डोळ्यानेच खुणावून मतदान केल्याचे सांगत होते. संभाजीनगर प्रभागातील मतदान केंद्राला दुपारी दीड वाजता प्रतिमा सतेज पाटील यांनी भेट दिली; तर दुपारी दोन वाजता प्रतिभानगर प्रभागात आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. शहरातील मतदार दुपारी घराबाहेर पडत नसल्याचे चित्र असते; पण दुपारी दोन वाजताही अनेक मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. पद्माराजे उद्यान, दौलतनगर, फुलेवाडी, लक्षतीर्थ, आदी प्रभागांतील मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण होते. आम्ही ‘नि:स्वार्थी मतदार’! महापालिका निवडणुकीचा निकाल हा पैशावरच लागणार, हे जरी खरे असले तरी नि:स्वार्थी व बिनपैशाचे मतदान करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. कणेरकरनगर प्रभागातील नृसिंह कॉलनी येथील शंभरहून अधिक मतदारांनी ‘नि:स्वार्थी मतदार’ असे लिहिलेल्या गांधी टोप्या घालून मतदान केंद्रांवर हजेरी लावली. ताई २ नंबर, वहिनी ४ नंबर गेले पंधरा दिवस प्रचाराच्या माध्यमातून एका-एका मतदाराच्या दहा-पंधरावेळा गाठीभेटी झाल्या होत्या. तरीही मतदान केंद्रावर जाईपर्यंत मतदारांना विनवणी करण्याची संधी उमेदवार व समर्थक सोडत नव्हते. उमेदवार व समर्थक ताई २ नंबर, वहिनी ४ नंबर, दादा पहिलाच नंबर लक्षात ठेवा, अशी आठवण करून देत होते. मतदान केंद्रे अपुरी महापालिका प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुलभ व वेळेत व्हावी यासाठी ४१८ मतदान केंद्रांचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. परंतु आयोगाने लोकसभा व विधानसभेला जी केंद्रे होती त्यात बदल करण्यास नकार दिला. त्यामुळे ४० केंद्रे कमी झाली. परिणामी मतदानास विलंब झाला. व मतदानाची वेळ झाल्यानंतरही मतदानासाठी रांगा लागल्या. एका तासात सरासरी ८० मतदान मतदाराच्या ओळखीची खात्री करून घेण्यात वेळ जात असल्याने तासाला सरासरी ८० मतदान होई. शाहू उद्यान मतदान केंद्रात सरासरी ६० मतदान झाले तर अन्य काही ठिकाणी ते तासाला १०० पर्यंत गेले. कर्मचारी तत्पर आणि मतदार तरुण असेल तर ही प्रक्रिया लगेच होत होती. अशी मतदान प्रक्रिया.. ४प्रत्येक मतदान केंद्रात तीन मतदान कर्मचारी व एक केंद्राध्यक्ष अशी व्यवस्था होती. मतदार मतदान केंद्रात गेल्यानंतर त्याची पहिल्यांदा ओळख तपासून पाहण्यात येत असे. त्याचे मतदार यादीतील नाव, त्यावरील छायाचित्र, ओळखीसाठी त्याने आणलेल्या पुराव्यांवरील नाव व छायाचित्र याची पडताळणी केली जाई. ही खात्री झाल्यानंतर मतदार पुढे जाई. ४दुसऱ्या टेबलावरील कर्मचारी मतदार स्त्री आहे की पुरुष याची नोंद करून घेई व मतदार शीटवर मतदाराची स्वाक्षरी घेऊन त्याला स्लीप देई. ४तिसऱ्या टेबलवरील कर्मचारी स्लीप जमा करून घेई व डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून बॅलेट सोडण्याची सूचना देई. ४मतदार प्रत्यक्ष मतदान बूथमध्ये जावून मतदानाचा हक्क बजावत असे व दुसऱ्या बाजूने बाहेर गेल्यावर ही प्रक्रिया पूर्ण होई. तीनशेपासून पाच हजारांचे आमिष कोल्हापूर : मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी रिक्षा, आलिशान कार, पेट्रोलचे पैसे आणि ३०० रुपयांपासून ते अगदी पाच हजारांपर्यंत रुपयांची रोकड, गिफ्ट, आदी आमिषांचा वापर उमेदवारांनी करीत मोठ्या प्रमाणात मतदारांना मतदानासाठी बाहेर काढले. साहजिकच त्यामुळे मतदानाची आकडेवारी वाढली. उमेदवारांना ने-आण करण्यावरुन अनेक प्रभागात वादावादीचे प्रकारही घडले. असाच प्रकार कैलासगडची स्वारी येथील शिवराज विद्यालयातील केंद्राजवळ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला. उमेदवार व उमेदवारांच्या समर्थकांत मतदारांची ने-आण करण्यावरून वादावादी झाली. हा वाद न वाढविता ज्येष्ठ मंडळींनी तिथल्या तेथे मिटविला; तर दुसरा प्रकार रंकाळा स्टँड प्रभागात साडेबारा वाजण्याच्या सुमारास मतदारांची ने-आण करण्यावरूनच झाला. विशेष म्हणजे मतदार जरी प्रभागात राहत नसला तरी त्या मतदाराचा पत्ता शोधून त्याला रिक्षा किंवा अन्य आलिशान गाडीतून