शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

‘सरल’ ठरतेय शाळांसाठी अडथळ्यांची शर्यत

By admin | Published: August 13, 2015 10:36 PM

मुदत वाढविण्याची मागणी : सुविधांच्या अनुपलब्धतेमुळे आॅनलाईन डाटा करताना मुख्याध्यापकांसह शिक्षकांची त्रेधातिरपीट

अशोक खाडे -कुंभोज   सरल स्कूल डाटाबेस माहिती १५ आॅगस्टपूर्वी आॅनलाईन भरण्याची लगीनघाई संपूर्ण राज्यभर एकाचवेळी सुरू असताना शाळा पातळीवर या कामासाठी आवश्यक सुविधांचा अभाव, तज्ज्ञ शिक्षकांची उणीव, वेळखाऊ माहिती संकलन तसेच इंटरनेट सुविधेत निर्माण होणाऱ्या व्यत्ययामुळे सरलच्या कामात अडथळ्यांची शर्यंत पार करताना प्राथमिक शिक्षकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. सरल माहिती भरण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी शाळांकडून होत आहे.अलीकडे शाळा पातळीवर मिळणारे सर्व प्रकारचे अनुदान रेकॉर्ड, शिष्यवृत्ती फॉर्म, शालेय पोषण रेकॉर्ड, आदी कामांची माहिती आॅनलाईन झाली आहे. याशिवाय शिक्षकांच्या पगारासाठी शालार्थ प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या सर्व प्रक्रियेची भिस्त थेट मुख्याध्यापकांवर टाकल्यामुळे आॅनलाईन पद्धत अद्यापही पचनी न पडलेले मुख्याध्यापक अक्षरश: सैरभैर झाले आहेत. याकामी कोणतीही कुचराई क्षम्य नसल्याने मुख्याध्यापक सातत्याने तणावाखाली वावरताना दिसत आहेत. त्यातच सरल डाटाबेस योजनेंतर्गत शाळा, विद्यार्थी तसेच शिक्षकांची माहिती इत्यंभूतपणे आणि तीही मुदतीत आॅनलाईन भरावयाची आहे. विहीत मुदत संपण्यास केवळ चार दिवस उरल्याने मुख्याध्यापकांसह शाळेतील जबाबदार शिक्षकांच्या पायी अक्षरश: भिंगरी आली आहे. कुठे संगणक आहे, तर कुठे नाही. असेल तर सुस्थितीत असेलच असे नाही. अपवाद वगळता बहुतेक शाळांत इंटरनेटची जोडणी नाही आणि सर्व असेलच तर संगणक व इंटरनेट हाताळण्यात तरबेज शिक्षकांची वानवा आहे. अशा दळभद्री अवस्थेत ही कामे करताना शिक्षकांचे लक्ष शाळेपासून आपसूकच विचलित होत आहे. परिणामी, या कालावधीत शाळांतील शैक्षणिक वातावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. सरल माहिती भरण्याच्या वेबसाईटचे नूतनीकरण करण्याची कामे मुदत संपत आली, तरी सुरूच असल्याने प्रामुख्याने अधिक तर विद्यार्थी माहितीचे काम अपूर्णावस्थेत आहे. शाळांना ही कामे पदरमोडीतून करावी लागत आहेत. सुविधांच्या उपलब्धतेचा विचार न करता वेळखाऊपणाचे हे काम करताना इंटरनेटची सुविधा नसणारे तसेच इंटरनेट वापरण्यास न येणारे मुख्याध्यापक व शिक्षक माहितीच्या कागदांचे भेंडोळे घेऊन पै-पाहुणे, मित्रमंडळी, सहकारी शिक्षकांच्या घरी येरझाऱ्या घालत आहेत. आॅनलाईन प्रक्रिया शाळा, शिक्षक तसेच एकूणच शैक्षणिक क्षेत्रासाठी हिताची असल्याने त्रास सोसूनही आॅनलाईन कामांच्या पूर्ततेसाठी शाळांनी याकामी वाहून घेतल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा सुरळीत मिळत नसल्याने सरल प्रणालीअंतर्गत आॅनलाईन माहिती भरण्यास वेळ लागत आहे. शिक्षक माहितीस ३१ आॅगस्ट, तर विद्यार्थी माहितीस ३० सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक संघटनेमार्फत राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.- प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष, पुरोगामी शिक्षक संघटनागुणवत्ता सिद्ध करण्याची संधीजिल्हा परिषदेच्या शाळांना आॅनलाईन प्रक्रियेशी जुळवून घेणे अद्यापही जड जात आहे. पर्यायाने प्राथमिक शिक्षकांनी केवळ आॅनलाईन कामापुरतेच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातील एकूण बदल स्वीकारण्याची तत्परता अंगी बाळगल्यास हलक्याफुलक्या कामांनी गांगरून न जाता समर्थपणे सामोरे जाणे शक्य होईल. त्याचबरोबर शिक्षकांना शाळांसह स्वत:कडील गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल.