कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दयावर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या आणि राज्यातील गडगोट संवर्धनाच्या कामात स्वत:ला अव्याहतपणे वाहून घेतलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुरुवारी पन्नासाव्या वाढदिनी राज्यभरातून सुवर्णमहोत्सवी शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव झाला.कोल्हापूरच्या मातीतलं, महाराष्ट्राच्या मनातलं आणि संसदेच्या प्रांगणातलं आदरयुक्त व्यक्तीमत्व अशी वेगळी छाप पाडणाऱ्या संभाजीराजे यांचा गुरुवारी पन्नासावा वाढदिवस अपूर्व उत्साहात आणि चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत शुभेच्छांच्या वर्षावात साजरा झाला. महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी खास कोल्हापूरला येऊन संभाजीराजेंना शुभेच्छा दिल्या आणि छत्रपतीं घराण्याबद्दल आपला आदर व्यक्त केला.खासदार संभाजीराजे यांना ह्ययुथ आयकॉनह्ण तसेच मराठा समाजाचे नेते म्हणून राज्यभर ओळखले जाते. सकाळी नऊ वाजल्यापासून न्यू पॅलेज, भवानी मंडप येथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी युवकांची प्रचंड गर्दी उसळली होती. शुभेच्छा देण्याकरिता अक्षरश: रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. राजकिय, सामाजिक, शैक्षिणक, सांस्कृतिक, क्रीडा, औद्योगिक, साहित्यिक, वैद्यकिय क्षेत्रातील मान्यवर, पोलिस तसेच प्रशासकिय अधिकारी अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी संभाजीराजेंना शुभेच्या दिल्या. राज्यातील काही मंत्री तसेच काही केंद्रीय मंत्री यांनीही त्यांना फोनवर शुभेच्छा दिल्या.न्यू पॅलेसवर सकाळी संभाजीराजे यांचे संयोगिताराजे यांच्यासह कुटुंबियांनी औक्षण केले. त्यानंतर त्यांनी करवीरनिवासिनी अंबाबाई तसेच कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. दिवसभर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. संभाजीराजे यांच्यावरील जनतेच्या निर्व्याज प्रेमाची प्रचिती या गर्दीत दिसून आली. रात्री न्यू पॅलेस येथे शानदार कार्यक्रमात केप कापून वाढदिवस साजरा झाला.
खासदार संभाजीराजेंवर सुवर्ण महोत्सवी शुभेच्छांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 9:23 PM
Sambhaji Raje Chhatrapati Kolhapur- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दयावर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या आणि राज्यातील गडगोट संवर्धनाच्या कामात स्वत:ला अव्याहतपणे वाहून घेतलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुरुवारी पन्नासाव्या वाढदिनी राज्यभरातून सुवर्णमहोत्सवी शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव झाला.
ठळक मुद्देखासदार संभाजीराजेंवर सुवर्ण महोत्सवी शुभेच्छांचा वर्षाव