शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

खासदार संभाजीराजेंवर सुवर्ण महोत्सवी शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:23 AM

कोल्हापूरच्या मातीतलं, महाराष्ट्राच्या मनातलं आणि संसदेच्या प्रांगणातलं आदरयुक्त व्यक्तिमत्त्व अशी वेगळी छाप पाडणाऱ्या संभाजीराजे यांचा गुरुवारी पन्नासावा वाढदिवस ...

कोल्हापूरच्या मातीतलं, महाराष्ट्राच्या मनातलं आणि संसदेच्या प्रांगणातलं आदरयुक्त व्यक्तिमत्त्व अशी वेगळी छाप पाडणाऱ्या संभाजीराजे यांचा गुरुवारी पन्नासावा वाढदिवस अपूर्व उत्साहात आणि चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत शुभेच्छांच्या वर्षावात साजरा झाला. महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खास कोल्हापूरला येऊन संभाजीराजेंना शुभेच्छा दिल्या आणि छत्रपतीं घराण्याबद्दल आपला आदर व्यक्त केला.

खासदार संभाजीराजे यांना ‘युथ आयकॉन’ तसेच मराठा समाजाचे नेते म्हणून राज्यभर ओळखले जाते. सकाळी नऊ वाजल्यापासून न्यू पॅलेज, भवानी मंडप येथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी युवकांची प्रचंड गर्दी उसळली होती. शुभेच्छा देण्याकरिता अक्षरश: रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. राजकीय, सामाजिक, शैक्षिणक, सांस्कृतिक, क्रीडा, औद्योगिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, पोलीस तसेच प्रशासकीय अधिकारी अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी संभाजीराजेंना शुभेच्या दिल्या. राज्यातील काही मंत्री तसेच काही केंद्रीय मंत्री यांनीही त्यांना फोनवर शुभेच्छा दिल्या.

न्यू पॅलेसवर सकाळी संभाजीराजे यांचे संयोगिताराजे यांच्यासह कुटुंबीयांनी औक्षण केले. त्यानंतर त्यांनी करवीरनिवासिनी अंबाबाई तसेच कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. दिवसभर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. संभाजीराजे यांच्यावरील जनतेच्या निर्व्याज प्रेमाची प्रचिती या गर्दीत दिसून आली. रात्री न्यू पॅलेस येथे शानदार कार्यक्रमात केप कापून वाढदिवस साजरा झाला.

फोटो क्रमांक - ११०२२०२१-कोल-संभाजीराजे०१

ओळ - राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा ५० वा वाढदिवस गुरुवारी अपूर्व गर्दीच्या साक्षीने साजरा झाला. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी भवानी मंडप येते अक्षरश: रांग लागली होती. छाया : आदित्य वेल्हाळ

फोटो क्रमांक २ - क्रमांक ११०२२०२१-कोल-संभाजीराजे०२

ओळ - राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा ५० वा वाढदिवस गुरुवारी साजरा झाला. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.