नऊ वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने रत्नागिरीत पदार्पण केले ते भैरीदेवाच्या साक्षीने. आतापर्यंत या दैनिकाचा प्रवास हा उत्कर्षाच्या दिशेनेच होत आहे. ‘लोकमत’ हे दैनिक आता सर्वांच्या आवडीचे झाले असून, ते आता अगदी तळागाळापर्यंत पोहोचले आहे. यापुढेही या दैनिकाची प्रगती उत्तरोत्तर होवो, अशी सदिच्छा रत्नागिरीचे श्रद्धास्थान असलेल्या भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्ना सुर्वे यांनी ‘लोकमत’च्या वर्धापनदिनी आयोजित करण्यात आलेल्या पुरवणी प्रकाशन सोहळ्याप्रसंगी व्यक्तकेली. याप्रसंगी देवस्थानचे विकास मयेकर, प्रकाश विलणकर, प्रकाश घुडे, चंद्रकांत गावखडकर, बंटी गुरव, आदी उपस्थित होते.रत्नागिरी : ‘लोकमत’ रत्नागिरी आवृत्तीच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात मान्यवर, वाचक व हितचिंतकांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी दीपप्रज्वलन करून स्नेहमेळाव्याचे उद्घाटन केले.यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, राज्य परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो, भारत संचार महानिगमचे प्रबंधक सुहास कांबळे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, आदी मान्यवर उपस्थित होते. या स्नेहमेळाव्यास नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, आमदार उदय सामंत, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उपनगराध्यक्ष संजय साळवी, तालुकाप्रमुख व नगरसेवक बंड्या साळवी, राज्य परिवहन महामंडळाचे विभागप्रमुख के. बी. देशमुख, आगारप्रमुख विवेक लोंढे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना संपादक वसंत भोसले यांनी ‘लोकमत’च्या विस्ताराची माहिती दिली. समाजातील समस्यांचा मुळापासून अभ्यास करून ते प्रतिबिंब पत्रकारांच्या लेखणीतून उमटले पाहिजे, असा ‘लोकमत’चा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महामार्ग चौपदरीकरण आणि त्याबाबतच्या जनमानसांतील प्रतिक्रिया यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी एस. टी. महामंडळाच्या सेवेचेही कौतुक केले. वर्तमानपत्रांना आजही सर्वांत मोठा आधार एस. टी. महामंडळाचा असल्याचे सांगून तळागाळापर्यंत जाणाऱ्या अशा सेवा कायम टिकून राहिल्या पाहिजेत आणि आपण त्या सक्षम केल्या पाहिजेत, असेही सांगितले. यावेळी बहुसंख्य रत्नागिरीकर ‘लोकमत’ला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव
By admin | Published: January 15, 2016 11:39 PM