कोल्हापूर : निवासस्थानी, संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेटून, मोबाईलवरून संवाद साधून, व्हॉटस् अॅप, हाईक अशा सोशल मीडियांच्या माध्यमातून संदेश पाठवून नूतन नगरसेवकांवर समर्थक, कार्यकर्त्यांसह प्रभागातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले. शुभेच्छांचा स्वीकार आणि मतदारांचे आभार मानण्यात नूतन नगरसेवकांचा मंगळवारचा दिवस सरला.कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यानंतर निवडणूक जिंकलेल्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. नूतन नगरसेवकांची मंगळवारची सकाळ देखील शुभेच्छांनी उजाडली. त्यांच्या निवासस्थानी तसेच संपर्क कार्यालयात त्यांच्या यशासाठी दिवस-रात्र झटलेले अनेक कार्यकर्ते, समर्थकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. दिवसभरात शुभेच्छांचा स्वीकार करण्यासह मतदान करून विजयापर्यंत पोहोचविणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यात बहुतांश नगरसेवक मग्न होते. यात काही नगरसेवकांनी समर्थकांसह प्रभागात घराघरांत फिरून मतदारांचे आभार मानले. यात त्यांचे कुटुंबीय उत्साहीपणे सक्रिय होते. खर्चासह कमी-जादाचा हिशेबविजयी उमेदवारांसह पराभूत उमेदवारांनी फेरनिहाय मतदानाची आकडेवारी घेऊन आपण कुठे कमी पडलो आणि वरचढ ठरलो, याचे विश्लेषण केले. निवडणुकीत उमेदवारांनी केलेला खर्च सादर करणे आयोगाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे आर्थिक हिशेबाचा काही उमेदवारांनी आढावा घेतला.
शुभेच्छांचा वर्षाव, मतदारांचे आभार
By admin | Published: November 03, 2015 11:44 PM