शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

‘हरळी’करांच्या निर्णयामुळे महिलांमध्ये संताप !

By admin | Published: December 08, 2015 12:49 AM

दारूबंदीला हरताळ : चळवळीतील कार्यकर्ते पुन्हा आक्रमक

राम मगदूम --- गडहिंग्लज  महिलांनी बहुमताने देशी दारू दुकान बंद केलेल्या हरळी बुद्रुक येथे बीअर बार व परमीट रूम सुरू करण्यास परवानगी देण्याचा ठराव बहुमताने ग्रामसभेत मंजूर करून घेण्यात आला. त्यामुळे महिलांच्या मतदानाने दारूबंदी झालेल्या गडहिंग्लज तालुक्यातील १० गावांतील महिलांच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली आहे. २००९ मध्ये हरळी बुद्रुक आणि हरळी खुर्द या गावातील देशी दारू दुकान बंद करण्याचा निर्णय महिलांच्या मतदानाने बहुमताने झाला. त्यानंतर दोनवेळा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. दोनही वेळेला ‘दारू’च्या समर्थकांचीच सत्ता हरळी बुद्रुक ग्रामपंचायतीवर आली. त्यामुळे बंद झालेली ‘देशी’ पुन्हा ‘वेशी’त आणण्याचा खटाटोप सुरू झाला. त्यासाठी एकदा ‘ग्रामसभा’ झाल्याची खोटी कागदपत्रेही रंगविण्यात आली. मात्र, दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तो हाणून पाडला.दरम्यान, आठवड्यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत गावात बीअर बार सुरू करण्यास परवानगी देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करून घेण्यात आला. त्या विरोधात आंदोलनाचा इशारा ‘जिल्हा दारूबंदी समिती’ आणि ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. प्रांतांचा आदेशही बेदखल जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असताना हरळीत ग्रामसभा घेतली कशी? त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतली होती का? या मुद्द्यांच्या खुलाशासह ग्रामसभेचे व्हिडिओ शूटिंग आणि सभेच्या कामकाजाचा अहवाल ३ डिसेंबरपूर्वी सादर करण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना दिला होता. तलाठ्याकरवी पाठविलेला हा आदेश परत आला. त्यानंतर ‘बीडीओ’मार्फत आदेश बजावण्यात आला. परंतु, त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रांतांनी सोमवारी बीडीओंना ‘स्मरणपत्र’ पाठविले आहे.माता-भगिनींच्या भावनांचे काय?८ वर्षांपूर्वी ‘उभी’ बाटली ‘आडवी’ करण्याची चळवळ मुगळीतून सुरू झाली. हसूरचंपूचा अपवाद वगळता १० गावांत त्यास यश आले. प्रसंगी मजुरी बुडवून मुला-बाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिलांनी झटून आडवी केलेली बाटली अधिकृतरीत्या उभी करण्याचा प्रयत्न हरळीत सुरू आहे. त्याचे लोण जिल्ह्यात अन्यत्र पसरू नये म्हणून दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा कंबर कसली आहे.महिलांच्या भावनांचा अनादर आणि गावच्या विकासासाठी मिळालेल्या सत्तेचा गैरवापर करून पुन्हा दारू दुकान सुरू करण्याचा प्रयत्न हरळीत झाला आहे. त्यामुळे दारूबंदी झालेल्या गावात पुन्हा दारू दुकानास परवानगी मिळू नये, यासाठी व्यापक समाजप्रबोधनाची गरज आहे.- कॉ. उज्ज्वला दळवी, गडहिंग्लज दारूबंदी चळवळ कार्यकत्यामहिलांच्या मतदानाने दारूबंदी झालेली गावे२१ जानेवारी २००७ - मुगळी१२ आॅगस्ट २००७ - दुंडगे१८ सप्टेंबर २००९ - हरळी बुद्रुक१८ सप्टेंबर २००९ - हरळी खुर्द३ आॅगस्ट २०१० - नांगनूर६ आॅक्टोबर २०१० - इंचनाळ१४ डिसेंबर २०१० - अत्याळ१७ जून २०११ - मुत्नाळ३० नोव्हेंबर २०११ - कळविकर्ट्टे.