शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कष्टकऱ्यांची वादळी चळवळ उभारणार

By admin | Published: December 27, 2014 12:31 AM

भारत पाटणकर : आजऱ्यात श्रमिक मुक्ती दलाचे १८ वे राज्यस्तरीय अधिवेशन

आजरा : जातीयवाद व धर्मांधतेचा अर्क असणारी मंडळी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पायदळी तुडवत ‘अच्छे दिन’ची घोषणा करीत महाराष्ट्रासह देशात सत्तेवर आली आहे. विकासाची चर्चा दूरच ठेवत नथुराम गोडसे आणि धर्मांतर याचीच चर्चा घडवून आणली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पातळीवर कष्टकऱ्यांची वादळी चळवळ उभी करण्याचा निर्णय घेण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे अधिवेशन बोलविले आहे, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी केले.चित्रानगर (आजरा) येथे आयोजित १८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. श्रमिक मुक्ती दलाचे घोषणा देणारे कार्यकर्ते, भजनी मंडळे, सजवलेल्या बैलगाड्यांमध्ये असणारे डॉ. पाटणकर, महात्मा फुले, संत गाडगेबाबा यांच्या वेशातील डॉ. नवनाथ शिंदे, नारायण भडांगे मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते.डॉ. पाटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. गेल अ‍ॅम्व्हेट व इंदुताई पाटणकर यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, आदींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.डॉ. पाटणकर म्हणाले, श्रमुदच्या माध्यमातून ३४ वर्षे कष्टकऱ्यांचे लढे उभारले गेले. केवळ वैचारिक मांडणी करून समाज बदलत नाही. विचार अमलात आणण्याची गरज आहे. जी माणसे काम केल्याशिवाय व घाम गाळल्याशिवाय जगू शकत नाहीत, अशा मंडळींच्या पाठबळावर संघटनेची वाटचाल सुरू आहे. गौतमबुद्धांपासून ते कार्ल मार्क्सपर्यंत क्रांतिकारी विचार देणाऱ्यांच्या विचारावर शाश्वत व पर्यावरण संतुलित विकास घडविण्यासाठी संघटना बांधील आहे, असेही स्पष्ट केले.राज्य संघटक संपत देसाई म्हणाले, स्वत:च्या प्रश्नावर लढत लढत वैचारिक बैठक निर्माण करणाऱ्यांची ही संघटना आहे. कष्टकऱ्यांना ऊर्जा देण्यासाठी अधिवेशन गरजेचे आहे. राज्यभरातील मान्यवरांशी संवाद साधल्यानंतर विचारांना दिशा मिळण्याचे काम होते. अधिवेशनामध्ये कष्टकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ठोस भूमिका मांडली जाणार आहे. यावेळी वाहरू सोनवणे, अ‍ॅड. कृष्णा पाटील (तासगाव), दिलीप पाटील (कऱ्हाड), उत्तमराव भुजबळ, प्रकाश मोरूसकर, गणपतराव घागरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)