दत्ता पाटीलम्हाकवे : बस्तवडे ता कागल येथील वेदगंगा नदीमध्ये पोहताना बुडालेल्या हर्षद दिलीप येळमटे (वय१७ रा.अथणी) या युवकाचा मृतदेह १७ तासानंतर आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाला मिळाला. हर्षदने दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेचा निकाल जून महिन्यात लागणार होता. माञ, त्यापुर्वीच नियतीच्या परीक्षेत तो हरल्याने त्याच्या आयुष्याचाच निकाल लागल्याने आणूर, अथणीसह सीमाभागात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्यासह सर्वच नातेवाईक आणूर ता. कागल येथील याञेसाठी गुरुदास लोकरे यांच्या घरी आले होते.काल शुक्रवारी दुपारी तीन वाजता नातेवाईकांसोबत पोहण्यासाठी वेदगंगा नदीत उतरले होते. यामध्ये बुडालेले जितेंद्र विलास लोकरे (वय३६ रा.मुरगुड ता.कागल), रेश्मा दिलीप येळमल्ले (३४ रा अथणी ), सविता अमर कांबळे (२७ रा.रुकडी ता.हातकणंगले) याचा मृतदेह बस्तवडे येथील अवधुत वांगळे व प्रमोद पाटील यांनी बाहेर काढले होते. दरम्यान, हर्षदचा मृतदेहाची राञी उशिरापर्यंत शोधपथकाद्वारे शोध मोहीम सुरू होती. मात्र, अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. आज, शनिवारी हर्षदचा मृतदेह सापडला.त्या अद्यापही भेदरलेल्याच..साधना जितेंद्र लोकरे (३० रा.मुरगुड ता कागल) यांना बस्तवडे येथील अवधुत वांगळे यांनी बाहेर काढल्याने त्या बचावल्या. माञ, घटलेल्या घटनेने अद्यापही भेदरलेल्या आहेत.
Kolhapur: बस्तवडेतील वेदगंगा नदीत बुडालेल्या हर्षदचा मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 12:48 PM