शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

Hasan Mushrif ED Raid : पोलिसांचा विरोध झुगारून कार्यकर्ते मुश्रीफांच्या निवासस्थानकडे, भाजप विरोधात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:37 AM

हसन मुश्रीफ यांना त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घडत असलेला हा निंदनीय प्रकार

जहाँगीर शेखकागल : आमदार हसन मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानावर ईडीचा छापा पडल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरू केली आहे. या दोन्ही ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कागल शहरातील प्रमुख मार्गावर दुकाने बंद ठेवली आहेत.

पोलिसांचा विरोध झुगारून कार्यकर्ते  मुश्रीफांच्या निवासस्थानासमोर गेले. यासर्व प्रकारामुळे कागलमधील वातावरण तणावपुर्ण  बनले आहे. अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी भय्या माने, युवराज पाटील यांना सांगून कार्यकर्त्याना गैबी चौकात आणले.आमदार हसन मुश्रीफ हे मुबंईत असून प्रकाश गाडेकरही परगावी आहेत. या कारवाईची कागल पोलिसांना ही कल्पना नव्हती. त्यांनाही कारवाई ठिकाणापासुन दूर ठेवण्यात आले आहे. जवळपास तीस ते पस्तीस जणांचे पथक असून केंद्रीय पोलिसांचा बंदोबस्त या पथकाबरोबर आहे. निवासस्थाच्या चारी बाजुला हा बंदोबस्त आहे. मुश्रीफांच्या निवासस्थानी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, जेष्ठ चिरंजीव साजीद मुश्रीफ हजर आहेत.गडहिंग्लज शहर बंदचा निर्णय हसन मुश्रीफ यांना त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घडत असलेला हा निंदनीय प्रकार आहे, याचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज बंद करण्याचा आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. घरामध्ये एके 47 रायफली तैनात केलेले पोलिस लावून अशा पद्धतीची दहशत माजवून एका चांगले काम करणाऱ्या नेत्याला असा मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने घातलेले हे ईडीचे छापे आहे,  त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांना उद्योजकांना सर्वांनी आजच्या दिवशी गडहिंग्लज कडकडीत बंद पाळण्यात यावा, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. दुसरीकडे मुरगूडमधील व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा