शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

Hasan Mushrif: 'ईडी'च्या पथकाचा कोल्हापूर जिल्हा बँकेच्या हरळी शाखेवरही छापा, गडहिंग्लजमध्ये खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 6:54 PM

गेल्या महिन्यात 'ब्रिस्क कंपनी'च्या पुणे येथील कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता

राम मगदूमगडहिंग्लज ( जि.कोल्हापूर): हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवरदेखील सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने (ईडी) आज, बुधवारी(१) दुपारी छापा टाकला.सायंकाळी उशीरापर्यंत बंदोबस्तात शाखेतील व्यवहार आणि कागदपत्रांची तपासणी सुरू होती. त्यामुळे गडहिंग्लज विभागातही खळबळ उडाली.२०१३-१४ मध्ये तत्कालीन मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानेच येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना सहयोग तत्त्वावर 'ब्रिस्क फॅसिलिटीज प्रा.लि.कंपनी'ला १० वर्षांसाठी चालवायला देण्यात आला होता. दरम्यान, एप्रिल २०२१ मध्ये कराराची मुदत संपण्यापूर्वीच कंपनीने कारखाना सोडला आहे. परंतु, सुरुवातीला जिल्हा बँकेने कंपनीला अर्थसहाय्य केले होते. त्या पार्श्वभूमीवरच हा छापा टाकण्यात आल्याची चर्चा आहे.मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेच्या मुख्यालयासह विविध शाखांवर आज 'ईडी'ने छापे टाकले. त्यापैकीच एका पथकाने हरळी येथील गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याच्या शेजारी असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापा टाकला. 'ईडी'चे पथक दाखल होताच बाहेरच्या इतर कुणालाही बँकेत येण्या- जाण्यास मज्जाव करण्यात आला होता‌. शाखेबाहेर ‘सीआरपीएफ’चा बंदोबस्त होता.दरम्यान, गडहिंग्लज कारखान्यात १०० कोटी रुपये बेनामी असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर केला होता. गेल्या महिन्यात 'ब्रिस्क कंपनी'च्या पुणे येथील कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. मात्र, त्यावेळी 'गडहिंग्लज'कडे ईडीचे अधिकारी फिरकले नव्हते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय