कोल्हापूर : कर्जमाफीबाबत सरकारच्या पातळीवरून रोज एक अध्यादेश येत असल्याने सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी आजारी पडू लागले आहेत. सरकारला खरेच कर्जमाफी द्यायची आहे का? हा प्रश्न असून, कमीत कमी शेतकºयांना पैसे कसे मिळतील, यासाठीच वरिष्ठ अधिकारी व आयटी विभागाच्या अधिकाºयांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्टÑवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून केला.
आॅनलाईनऐवजी आॅफलाईन प्रक्रिया राबविली असती तर आतापर्यंत सर्व प्रश्न संपले असते; पण अधिकाºयांकडून कर्जमाफीचा बट्ट्याबोळ केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लेखापरीक्षकांच्या तपासणीनंतर प्रोत्साहनपर अनुदान योजनेसह २ लाख ६२ हजार ४६७ शेतकºयांच्या ५८५ कोटी १३ लाखांचा प्रस्ताव जिल्हा बॅँकेने शासनास दिला आहे; पण जूनपासून अद्याप सरकारी पातळीवर याद्यांचाच घोळ सुरू आहे. रोज वेगवेगळी २० परिपत्रके तसेच सोशल मीडियावरून सूचना दिल्या जातात. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी अवस्था झाली आहे. अधिकारी कामाच्या ताणामुळे आजारी पडू लागले आहेत, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांना गावात जाणे मुश्कीलमंत्रालयात असलेल्या सहकार खात्याबरोबरच आयटी विभागाच्या अधिकाºयांकडून कर्जमाफीचा पुरता बट्ट्याबोळ केला गेला आहे. यामुळे शेतकºयांमध्ये कमालीचा असंतोष पसरल्याने मुख्यमंत्री व मंत्र्यांना गावात जाणे मुश्कील होईल, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.‘त्या’ २७ शेतकºयांचे पैसे कधी?सरकारने दिवाळीपूर्वी कर्जमाफी दिली, हे सांगण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील २७ शेतकºयांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देऊन त्यांचा जमाखर्च बॅँक पातळीवर करण्याचे आदेश दिले. बॅँकेने जमाखर्च केला; पण त्यातील दमडीही बॅँकेला मिळाली नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.