शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

हातकणंगले नगरपंचायत, हुपरी नगरपरिषदेसाठी प्रतीक्षा

By admin | Published: June 24, 2016 12:17 AM

ग्रामस्थांमध्ये निराशा : नगरविकास विभागाकडून अंमलबजावणीच नाही

दत्ता बिडकर --हातकणंगले --शासनाने नगरपालिका निवडणुकीची घोषणा केली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी, कबनूर, हातकणंगले नगरपंचायती -नगरपरिषदासाठी शासनस्तरावर कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू नसल्याने या गावामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वरील तीनही गावांचा समावेश नगरविकास विभागाकडे होणार असल्याचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ठामपणे सांगत आहेत. मात्र, निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे या गावाच्या पदरी निराशाच आली आहे.हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावच्या लोकसंख्येचा विचार होऊन ग्रामस्थांना नागरी सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी मोर्चा, उपोषण यासारखी आंदोलने करून हुपरी नगरपंचायतीची अधिसूचना काढण्यास शासनाला भाग पाडले. अधिसूचना काढून आठ-दहा महिने संपूनही अद्याप याबाबत नगरविकास विभागाने अंमलबजावणी केली नाही.आघाडी सरकारने राज्यातील तालुक्याची गावे नगरपंचायतींनी जोडण्याचा महत्त्वाकांशी निर्णय घेतला होता. सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची गावे चार महिन्यांपूर्वी शासनाने नगरपंचायतीमध्ये रूपांतर केली. या नगरपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबरअखेर होत आहेत. शासनाने सांगली जिल्ह्याला वेगळा न्याय आणि कोल्हापूरला वेगळा ही भूमिका ठेवली आहे. हातकणंगले हे तालुक्याचे गाव असून गेली दोन वर्षे नगरपंचायत होण्यासाठी प्रतीक्षेत आहे.कबनूर ग्रामपंचायत इचलकरंजी शहराचा एक भाग बनून राहिली आहे. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या तालुक्यामध्ये सर्वाधिक आहे. इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी या ग्रामपंचायतीचे स्वतंत्र नगरपरिषदेमध्ये रूपांतर होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले आहेत. या ग्रामपंचायतीचा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची परवानगी घेऊन तो मंत्रालयामध्ये मंजुरीसाठी सादर केला आहे.वरील तीन ग्रामपंचायतींचा समावेश नगरविकास विभागाकडे झाल्यास तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यसंख्या कमी होणार आहे. यामुळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. याची धास्ती अनेक दिग्गज जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली आहे.प्रस्ताव शासन दरबारीहुपरी आणि हातकणंगले ग्रामपंचायतीचे नगरपंचायती- नगरपरिषदासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजूर करून शासनाकडे पाठविले आहेत. शासनाच्या नगरविकास विभागाकडून याबाबत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायती-नगरपरिषदामध्ये होईल, असे मत जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) एम. एस. घुले यांनी व्यक्त केले.