शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

LokSabha Result 2024: काळजाचा ठोका चुकवणारा ‘हातकणंगले’चा निकाल

By राजाराम लोंढे | Published: June 05, 2024 12:35 PM

कमी मताधिक्यांमुळे शेवटपर्यंत माने-सरुडकरांमध्ये झुंज : विजयाचा लंबक आणि कार्यकर्त्यांची घालमेल

राजाराम लोंढे/आयुब मुल्लाकोल्हापूर : महाराष्ट्रात सर्वाधिक काटाजोड लढत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झाली. पहिल्या फेरीपासून काळजाचा ठोका चुकवणारे मताधिक्य धैर्यशील माने व सत्यजीत पाटील-सरुडकर यांच्या समर्थकांची घालमेल वाढवत होते. अगदी ६९च्या मताधिक्यापासून सरुडकरांनी आघाडी घेतली; पण त्यांना शेवटच्या फेरीपर्यंत मोठी आघाडी घेता न आल्याने शेवटपर्यंत दोघांमध्ये झुंज पाहावयास मिळाली. अखेर माने यांनी बाजी मारली आणि जल्लोष सुरू झाला.हातकणंगले मतदारसंघात उद्धवसेनेचे सत्यजीत पाटील-सरुडकर, शिंदेसेनेचे धैर्यशील माने व स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यातच सामना झाला. तिन्ही उमेदवार तगडे असल्याने येथे काटाजोड लढत होणार हे निश्चित होते; पण पहिल्या फेरीचा निकाल लागला आणि पाटील-सरुडकर यांनी धैर्यशील माने यांच्यावर अवघ्या ६९ ची आघाडी घेतली. शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यानंतरच्या चौथ्या फेरीपर्यंत सरुडकर यांनी ५४९९ चे मताधिक्य घेत आगेकूच सुरू केली; पण पाचव्या फेरीत १४४९चे मताधिक्य घेत माने यांनी आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. सहाव्या व सातव्या फेरीत सरुडकर यांनी अनुक्रमे ११०६ व ९० चे आघाडी घेतल्याने माने यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली. आठव्या व नवव्या फेरीत माने यांनी २११८ चे मताधिक्य घेत निवडणुकीत रंगत आणली. दहाव्या, अकराव्या व बाराव्या फेरीत सरुडकरांनी आघाडी घेतली. मात्र, चौदाव्या फेरीत माने यांनी मुसंडी मारली. त्यानंतरच्या फेरीत सरुडकर व माने यांच्यामध्ये कमालीची चुरस राहिली.सोळाव्या फेरीपासून माने यांनी निर्णायक विजयाकडे आगेकूच ठेवली होती. फेरीनिहाय मताधिक्याचा लंबक इकडून तिकडे राहिल्याने माने व सरुडकर समर्थकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. जल्लोष करण्याच्या मानसिकतेत कोणीच दिसत नव्हते. शेवटच्या तीन-चार फेऱ्या राहिल्यानंतरच माने समर्थकांनी जल्लोष सुरू केला.

ठाण्याची यंत्रणा कामी आली..हातकणंगलेत धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील यंत्रणा लावली होती. या यंत्रणेने लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्याची चर्चा मतदारसंघात होती.

हातकणंगले लोकसभा विधानसभानिहाय आघाडी..लोकसभा निवडणूक : २०१९  विधानसभानिहाय आघाडीधैर्यशील माने - आघाडीहातकणंगले : ४५,४६७.शाहूवाडी : २१,७४३इचलकरंजी : ७४,९३०

राजू शेट्टी - आघाडीशिरोळ : ७,०४८इस्लामपूर : १८,५५०शिराळा : २१,०४२.

लोकसभा निवडणूक : २०२४ विधानसभानिहाय आघाडीधैर्यशील माने - आघाडीहातकणंगले : १७,४९३इचलकरंजी : ३९,१७२शिरोळ : ३,२४७

सत्यजीत पाटील - आघाडीशाहूवाडी : १८,९९७इस्लामपूर : १७,४८१शिराळा : ९,२८१

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४dhairyasheel maneधैर्यशील मानेSatyajit Patilसत्यजित पाटील