शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

hatkanangale lok sabha result 2024: हातकणंगलेत सत्यजीत पाटील यांची आघाडी कायम

By उद्धव गोडसे | Updated: June 4, 2024 11:17 IST

hatkanangale lok sabha result 2024: पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने पिछाडीवर

कोल्हापूर : hatkanangale lok sabha result 2024 हातकणंगले मतदार संघात इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील (satyajit patil) यांनी चौथ्या फेरीअखेर ५७६२ मतांची आघाडी मिळवली. पहिल्या फेरीपासून आघाडी घेत पाटील यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने (dhairyasheel mane) यांना पिछाडीवर ढकलले. राजू शेट्टी (raju shetti) यांचा काहीच करिश्मा निकालात दिसत नाही.चौथ्या फेरीअखेर सत्यजीत पाटील यांना ७२ हजार ८२७ मते मिळाली. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना ६७ हजार ३१५ मते मिळाली. चौथ्या फेरीअखेर सत्यजीत पाटील यांनी ५७६२ मतांची आघाडी घेतली. येणा-या आठ ते दहा फे-यांमध्ये पाटील यांनी आघाडी टिकवल्यास त्यांना विजयाची संधी असेल. मात्र, फेरीगणिक मताधिक्य कमीजास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील आणि माने यांच्यातील चुरस अखेरच्या फे-यांपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला जात आहे.निवडणुकीचे बिगूल वाजताच हातकणंगले मतदार संघातून विजयी होण्याचा दावा करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना मात्र पहिल्या चार फे-यांमध्ये कमालीचा धक्का बसला आहे. त्यांची मते प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या निम्म्याहून कमी आहेत. या मतदार संघात वंचित आघाडीचे उमेदवार डी. सी. पाटील यांनाही करिश्मा दाखवता आला नाही. २०१९ च्या निवडणुकीत या मतदार संघात वंचितच्या उमेदवाराने सुमारे सव्वा लाख मते घेऊन राजू शेट्टी यांचे विजयाचे गणित बिघडवले होते. यावेळी वंचितच्या उमेदवाराला पहिल्या चार फे-यांमध्ये केवळ साडेसहा हजार मते मिळवता आली आहेत. त्यामुळे निकालात वंचितचा फॅक्टर दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Satyajit Patilसत्यजित पाटीलdhairyasheel maneधैर्यशील मानेRaju Shettyराजू शेट्टी