कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात मोठी ट्विस्ट दिसून आला. सुरुवातीपासून अतितटीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आघाडीवर असतानाच १९ व्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांनी आघाडी घेतली आहे. १८ फेरीअखेर धैर्यशील माने यांनी १२ हजार ११८ मतांनी आघाडी घेतली. माने यांनी आघाडी घेताच समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली.सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर हे अल्पशा मतांनी आघाडीवर होते. या दोन्ही उमेदवारांमध्ये कॉटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र, आता र्धेर्यशील माने यांनी दोन हजारांवर आघाडी घेतली आहे. अपेक्षेप्रमाणे मतमोजणीत कमालीची चुरस दिसत आहे. प्रत्येक फेरीत सत्यजीत पाटील आणि धैर्यशील माने यांच्यात मताधिक्य कमी-जास्त होत आहे. या लढतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी पिछाडीवर पडले आहेत.निवडणूक निकालाच्या आधीच राजू शेट्टी यांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला होता. मात्र मतमोजणीत राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसते. हातकणंगले मतदारसंघात एेनवेळेस शिवसेना उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटलांनी निवडणूक रिंगणात उतरवल्याने रंगत आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळ ठोकल्याने साऱ्या राज्याचे लक्ष या निकालाकडे लागून राहिले होते.
Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत ट्विस्ट; धैर्यशील माने आघाडीवर, समर्थकांचा जल्लोष सुरु
By पोपट केशव पवार | Published: June 04, 2024 3:52 PM