कोल्हापूर मतदारसंघाप्रमाणेचे जवळच असललेला हातकणंगले हा देखिल मतदार संघ स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यामुळे राज्यभर चर्चेत होता. राजू शेट्टी यांचेच वर्चस्व राहील अशी आशा असताना शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी चांगलीच आघाडी घेत स्वाभिमानीची दमदार बॅट असूनही त्याला धैर्यशील माने यांनी त्रिफळा करीत त्यांच्या हॅट्रीक ला खो घालत प्रथमच विजयी घोडदोड सुरु केली. त्यामुळे आता हातकणंगले मतदार संघात शिवसेनेलाचा ही जागा मिळाल्याच्या आनंदात सर्वत्र जल्लोष सुरु झाला आहे.
१३ व्या फेरीपर्यंत धैर्यशील माने यांनी १ लाख ५२ हजार ९९१ मत मिळविली असून राजू शेट्टी यांना १ लाख १६, ३०९ मत मिळाली आहेत. या निकालाच्या आघाडीने धैर्यशील माने यांच्या घरासमोर फटाक्यांची माळ उडविली जात असून तिथे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याचे चित्र दिसत आहे.
या शेतकऱ्यांचे नेते म्हणून परिचित असलेल्या महायुती पुरस्कृत स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची तसेच हॅट्रीक साधणार का म्हणून लक्ष लागले होते. परंतु याला आता धैर्यशील माने यांनी खो घातला असून त्यांनी मतमोजणीत चांगलीच आघाडी घेतली आहे.
हातकणंगले पहिल्या फेरीपासूनच चुरस पाहायला मिळाली सुरुवातीला पोस्टल मतात धैर्यशील माने यांनी आघाडी घेतली हीच आघाडी पहिल्या फेरीतही त्यांनी कायम राखली पहिल्या फेरी अखेर माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर अवघ्या 54 मतांची आघाडी घेतली शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी माने यांनी मोठे मताधिक्य घेतले पण शिरोळ वाळवा शिराळा शेट्टीच्या मागे राहिल्याने मताधिक्य घटले दुसऱ्या फेरी अखेर शेट्टी यांनी 5500हजाराचे लीड घेतले टपाल मतदानात राजस्व अधिकाऱ्याची सही नसल्याने पहिली 6 मते बाद झाली
मतदारसंघः हातकणंगले
फेरीः 13 वीआघाडीवरील उमेदवाराचे नावः धैर्यशील मानेपक्षः शिवसेनामतंः १ लाख ५८ हजार ९९१
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः राजू शेट्टीपक्षः स्वाभिमानीमतंः १ लाख ६३ हजार ०९लीड धैर्यशील माने : ४२ हजार ६८२