Hatkanangle Lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याविरोधात शिंदे गटाचे धैर्यशील माने अशी लढत होणार असल्याचे दिसत आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता वेगळा पावित्रा घेतल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीने या मतदारसंघात अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, आज महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून मोठा दबाव आहे. मात्र, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. काही दिवसातच या निर्णय होऊ शकतो असं बोललं जात आहे. दरम्यान, आता यावरुन खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे भाजपला तगडा झटका देणार; नाराज खासदार राऊतांच्या भेटीला
"यांना जर स्वाभिमान असेल तर त्यांना लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचे कारण नाही. त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे, पहिल्या दिवसापासून ते डायलॉग मारत आहेत. पण, दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हे वैचारिक गणित नाही. ते साखर कारखानदारांसोबत युती करतात तेव्हा ती कोणती आयडॉलॉजी युती करतात.त्यामुळे ते आयडॉलॉजीकल युतीमध्ये पडत नाहीत, इलेक्ट्रोरियल युतीकडे लक्ष देतात, मी कसा निवडून येईल. एवढाच त्यांचा निव्वळ प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला.
"पार्टीचं नाव स्वाभिमानी ठेऊन स्वाभिमानी होता येत नाही"
"महाराष्ट्रात ते स्वाभिमानी नावाची जी संघटना चालत आहेत, त्यामध्ये किती खासदार, आमदार किती जिल्हा परिषदमध्ये सदस्यांना बळ देत आहेत. ते निव्वळ आपल्या पुरत सेल्फ सेंट्रीक राजकारण करत आहेत.ते फक्त स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करण्याचे काम करत आहेत. आता कामाची सुरुवात झाली आहे, त्यांच्या पार्टीचं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. एखाद्या पार्टीचं नाव फक्त स्वाभिमानी ठेऊन काही स्वाभिमानी होता येत नाही त्याला स्वाभिमानानं वागावं लागतं, त्यांनी दरवेळी नवीन गोष्टी केल्या आहेत. त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे प्रत्येकवळी इथल्या जनतेने पाहिलं आहे, असंही माने म्हणाले.