शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हौद पाडण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू

By admin | Published: March 15, 2016 1:05 AM

बैठकीत चर्चा : पुरातन वास्तू संवर्धन समितीच्या सूचना; आयुक्त पाठविणार वस्तुनिष्ठ अहवाल

कोल्हापूर : शिवाजी पुलाजवळील ऐतिहासिक हौद पाडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका प्रशासन यांची अवस्था ‘बैल गेला, अन् झोपा केला’ अशी झाली आहे. शहर पुरातन वास्तू संवर्धन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हौद पाडण्याची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कशाच्या आधारे परवानगी द्यायची, अशी विचारणा करीत आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना समितीने अधिकाऱ्यांना केली. शिवाजी पुलाचे बांधकाम सुरू होऊन दोन वर्षे उलटली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने रीतसर शहर पुरातन वास्तू संवर्धन समितीकडे परवानगी मागितलेली नाही. तशी मनपानेही परवानगी दिलेली नाही, हे सोमवारच्या बैठकीत स्पष्ट झाले. समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर व सदस्य सचिव तथा मनपा नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता अभय आवटे, मनपा शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर नगररचनाकार नारायण भोसले, आर्किटेक्ट कॉलेजचे प्राचार्य संदीप दिघे, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते उदय गायकवाड, आदी उपस्थित होते. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शनिवारी या हौदाचे निम्मे बांधकाम तोडल्यानंतर या बैठकीत त्याच्या परवानगीवर चर्चा झाली. यापूर्वी दिलेला परवानगी मागणीचा अर्ज हा विहीत नसल्याने फेरप्रस्ताव सादर करावा, सोबत हौद, पंचगंगा घाट, शिवाजी पूल, ब्रह्मपुरी टेकडीबाबतची कागदपत्रेही द्यावीत, असे समितीने बांधकाम विभागास बजावले. दोन दिवसांत सर्व कागदपत्रांसह नकाशे समितीला सादर होतील, असे बांधकाम विभागातर्फे सांगितले. त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्याचे बैठकीत ठरले. केंद्रीय पुरातत्वच्या विभागाच्या परवानगी-शिवाय यापुढे पर्यायी पुलाचे काम सुरू होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले, त्यामुळे काम सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हतबलता दाखविली. मनपाची बांधकाम विभागास नोटीस हौदाचे बांधकाम पाडताना महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत पोकलॅँडच्या आडवे होऊन ही वास्तू ऐतिहासिक असल्याने परवानगी घेऊनच पाडावी, असा आग्रह धरला; परंतु आंदोलकांनी त्यांचे ऐकले नाही. त्यांना बाजूला करून हौद पाडण्यात आला. ऐतिहासिक वास्तू जतन करण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची आहे; परंतु महापौर, उपमहापौरांसह अनेक पदाधिकारी, नगरसेवकच तो पाडण्यात आघाडीवर राहिल्यामुळे शहर अभियंत्यांचा नाइलाज झाला. मात्र, शनिवारी महापालिकेस सुटी असूनही सायंकाळी तातडीने सरनोबत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास नोटीस बजावून हौद पाडला गेल्याबद्दल खुलासा मागविला आहे. त्याला बांधकाम विभागानेही उत्तर पाठविले आहे; परंतु हा कागदोपत्री खेळखंडोबा केवळ आपल्यावर काही आक्षेप येऊ नये, म्हणूनच सुरू आहेत. ‘पुरातत्व’कडे तक्रारी सह्याद्री इतिहास संशोधन केंद्रातर्फे केंद्रीय पुरातत्व विभागाकडे या प्रकाराची तक्रार केली आहे. ही पुरातन टेकडीचे संवर्धनाची जबाबदारी पालिकेची होती; परंतु ती ज्यांनी पार पाडलेली नाही, त्यांच्यावर कारवाई करावी, असे म्हटले आहे. अशाच तक्रारी पुरातत्वच्या मुंबई कार्यालय, पुरातन वास्तू संवर्धन समिती, पालिकेकडेही अन्य संस्थांनी तसेच इतिहासप्रेमींनी केल्या आहेत. केंद्रीय पुरातत्व विभागास विनंती संरक्षित वास्तू असलेला पाण्याचा हौद पाडल्याप्रकरणी पालिका केंद्रीय पुरातत्व विभागास वस्तुनिष्ठ अहवाल पाठवून पुढील कार्यवाही आपल्या स्तरावर करावी, अशी विनंती करणार असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. जर त्यांना फोटो, व्हीडिओ पाहिजे असल्यास तेही उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. पक्ष व नेते अडचणीत येणारकोल्हापुरातील सर्वपक्षीय कृती समितीने शनिवारी आंदोलन करून पाण्याचा हौद पाडला. त्यामध्ये महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आघाडीवर होते. पुरातन वास्तूंच्या यादीत समावेश असलेला हौद पाडल्यामुळे हे सर्वजण अडचणीत येण्याची शक्यता आहे. केंद्रीय पुरातत्व विभाग आता कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.