कोल्हापूर : हौसाबाई पवार ट्रस्ट वतीने कोरोना काळातील प्रकाशित साहित्यकृतींना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात कोल्हापूर मधील पाच साहित्यिकांचा समावेश आहे. पद्मजा पवार यांनी पुरस्कारांची घोषणा केली. परीक्षक म्हणून डॉ. सुजय पाटील, गौरी भोगले, डॉ जे. के. पवार यांनी काम पाहिले.
पुरस्कार विजेते साहित्यिक असे : काव्य विभाग : मृगजळ मागे पाणी - श्रीराम पचिंद्रे (कोल्हापूर), रिंगण - माधुरी मरकड (नगर), डोहतळ- मारुती कटकधोंड (सोलापूर), भाव विभोरी - डॉ. स्मिता गिरी (कोल्हापूर), तिमिरातूनी तेजाकडे - किरण पाटील (सरवडे, राधानगरी ) ललित-संकिर्ण व इतर विभाग : भयकंपित इतिहास - प्रा, विजयकुमार विनायक भवारी (पुणे), कोरोना अनलॉक - गुरुबाळ माळी (कोल्हापूर), लॉकडाऊन - ज्ञानेश्वर जाधवर (बार्शी), नोवेल कोरोना - डॉ. संदीप पाटील, भारतभूषण गिरी (कोल्हापूर), अर्थभान - प्रा. संजय ठिगळे (सांगली),परिपूर्ती - गणपती मोहिते (सातारा), चिन्हांकित यादीतली माणसं - माधव जाधव (नांदेड).
--