कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील नियोजित सेवा संस्थेला अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला नियमानुसार देता येत नाही, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचेबँकेचे कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी सांगताच माजी खासदार राजू शेट्टी मंगळवारी चांगलेच आक्रमक झाले. नियम सर्वांना सारखाच लावायचा. मनमानी पध्दतीने कामकाज करायचे नाही. नाही तर बँकेची सगळी माहिती माझ्याकडे आहे असे खडेबोल सुनावले.शिरोळ तालुक्यातील आकिवाट येथील नियोजित विमलनाथ चौगुले विकास सेवा सोसायटीच्या स्थापनेसाठी अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला जिल्हा बँक देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारपासून अकिवाटचे सरपंच विशाल चौगुले जिल्हा बँकेसमोर उपोषण सुरू केले आहे.
आज, मंगळवारी दुसऱ्या दिवशी माजी खासदार शेट्टी, प्रा. जालंदर पाटील, वैभव कांबळे, बंडू पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. यानंतर शेट्टी यांनी बँकेचे अधिकारी माने यांची कक्षात जावून भेट घेतली. अन् अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखल का देत नाही, असा जाब विचारला. संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटीलांचा नाच ठेवाराजकीय व्देषातून अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला देणार नसाल राजकारण करीत बँकेत बसा. विद्वावान संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटील यांचा नाच ठेवा, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला.