निवेदनात म्हटले आहे, चंदगड तालुक्यातील हलकर्णी एमआयडीसीमध्ये रविकिरण पेपर मिल कंपनी कार्यरत आहे. मिलमधील कामगारांना योग्य मोबदला दिला जात नाही. आठवड्याची सुट्टी दिली जात नाही. कामगारांनी वेळोवेळी मागणी करून दखल घेतली जात नसल्यामुळे नाइलाजाने संप केला. त्यावेळी कोणतेही कारण न देता सहा स्थानिक कामगारांना कामावरून कमी करण्यात आले.
मिलमध्ये दोन कंत्राटदारांकडे प्रत्येकी २२ आणि २६ कामगार दाखविले आहेत. त्यांनादेखील सध्या काम नसल्याचे कारण दाखवून कमी करण्यात आले आहे. कंपनीत सध्या ५० हून अधिक उत्तर भारतीय कामगार कामावर आहेत. त्यांना काम आहे. पण स्थानिक कामगारांना काम नाही.
एमआयडीसी उभारण्यासाठी स्थानिकांनीच आपल्या जमिनी दिल्या आहेत. परंतु, स्थानिक कामगारांवरच अन्याय केला जात आहे. त्यासाठी कामगारांना न्याय देण्यासाठी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कंपनी मालकांसोबत तत्काळ बैठक घेण्यात यावी.
शिष्टमंडळात, शिवसेनेचे चंदगड विधानसभा सहसंपर्कप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख, प्रभाकर खांडेकर, महिला संपर्कप्रमुख रंजना शिंत्रे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे प्रांतकचेरीचे शिरस्तेदार जीवन क्षीरसागर यांना सुनील शिंत्रे यांनी निवेदन दिले. यावेळी विजय देवणे, प्रभाकर खांडेकर, रंजना शिंत्रे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १०१२२०२०-गड-०३