शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

जखमेवर मीठ चोळायला आलाय काय? संतप्त मराठा आंदोलक : विधिमंडळ अंदाज समितीला विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 1:23 AM

कोल्हापूर : जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी भेट घेत ‘आमच्या जखमेवर मीठ चोळायला आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायला आला आहात काय?’ अशी संतप्त विचारणा केली. यावर अध्यक्ष आमदार अनिल कदम यांनी आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ...

ठळक मुद्देआरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडू : अनिल कदम

कोल्हापूर : जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी भेट घेत ‘आमच्या जखमेवर मीठ चोळायला आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायला आला आहात काय?’ अशी संतप्त विचारणा केली. यावर अध्यक्ष आमदार अनिल कदम यांनी आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवू, असे आश्वासन दिले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे गेल्या ३१ दिवसांपासून कोल्हापुरात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गत महिन्यात जिल्हा दौºयावर येणाºया विधिमंडळ अंदाज समितीला आंदोलकांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे या समितीने आपला दौरा रद्द केला होता. गुरुवारपासून ही समिती पुन्हा दौºयावर आल्याने संतप्त सकल मराठा समाजाच्या दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, स्वप्निल पार्टे, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर या आंदोलकांनी शासकीय विश्रामगृह गाठले. तेथे समितीचे अध्यक्ष आमदार अनिल कदम, सदस्य आमदार राजेश काशिवार व रमेश बुंदिले यांना ‘आमचे आंदोलन सुरू असताना तुम्ही जखमेवर मीठ चोळायला आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायला आला आहात काय?’ अशी विचारणा केली.

सरकारने १०० दिवसांत आम्हाला आरक्षण देतो, असे म्हटले होते; परंतु चार वर्षे झाली तरी निर्णय घेतला नाही. सरकार आरक्षण कसे देणार ते स्पष्ट करावे, असे एकापाठोपाठ प्रश्न विचारत आंदोलकांनी आमदार कदम, सदस्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर व आमदार प्रकाश आबिटकरांनी हस्तक्षेप करीत आम्ही नेहमीच मराठा आंदोलनामध्ये सहभागी आहोत; त्यामुळे समितीचे अध्यक्ष हे आंदोलकांच्या मागण्या मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवतील असा विश्वास दर्शविला. आमदार कदम यांनीही मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळात भूमिका स्पष्ट केल्याचे सांगितले. आंदोलकांनी लेखी मागण्या द्याव्यात, त्यावर सविस्तर पत्र तयार करून ते समिती सदस्यांच्या स्वाक्षरीने मुख्यमंत्री फडणवीस यांना देऊ अशी ग्वाही दिली.ठिय्या आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबादसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अनिल कदम, सदस्य आमदार राजेश काशिवार, रमेश बुंदिले तसेच आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, याबाबतची व्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवून पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, वसंतराव मुळीक, गणी आजरेकर, जयेश कदम, किशोर घाटगे, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते.

..तर मोर्चात सहभागी व्हामराठा समाजाबद्दल आत्मीयता असेल तर मुंबईत ४ सप्टेंबरला निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन इंद्रजित सावंत यांनी आमदार अनिल कदम यांना केले. यावर ‘आम्ही कायम समाजासोबत असून या मोर्चातही सहभागी होऊ, अशी ग्वाही कदम यांनी दिली.मराठा वसतिगृह गळकेसरकारने मराठा समाजासाठी नुसतेच आदेश काढले आहेत. कोल्हापुरात समाजासाठी बांधलेले वसतिगृहही पावसामुळे गळत असल्याचे सांगत इंद्रजित सावंत यांनी त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला.रणदिवेवाडी, निगवे खालसा ग्रामस्थांचा सहभाग : रणदिवेवाडी (ता. कागल) येथील हसन मुश्रीफ समर्थकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. यामध्ये माजी सरपंच बाजीराव खोत, उपसरपंच सुधाकर खोत, प्रकाश मोरे, पांडुरंग खोत, आदी सहभागी होते. निगवे दुमाला (करवीर) येथील जयहिंद सेवा संस्थेने सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवला. यात अध्यक्ष सर्जेराव एकशिंगे, प्रकाश पाटील, बाळासाहेब कुर्ते, शिवाजी शेजाळ सहभागी होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा