शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

नगराध्यक्षपदावरच सत्तेचा ‘लंबक’ अवलंबून !

By admin | Published: November 05, 2016 12:29 AM

गडहिंग्लज नगरपालिका : नगराध्यक्षाचा सामना तिरंगी होण्याची शक्यता

राम मगदूम -- गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत बहुमत कुणाचे होणार हे नगराध्यक्षपदाच्या निकालावरच अवलंबून आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या ‘सामन्या’कडेच शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. ‘सत्तेचा लंबक’ अवलंबून असणारा हा सामना तिरंगी होईल, असेच आजचे चित्र आहे. मात्र, प्रत्यक्ष लढतीसाठी माघारीची वाट पहावी लागणार आहे.सत्ताधारी जनता दलाने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारही सुरू केला आहे. राष्ट्रवादीतून आलेल्या वसंत यमगेकरांना भाजपने उमेदवारी दिली तर भाजपमधून आलेल्या रमेश रिंगणेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. याशिवाय काँगे्रसतर्फे सागर हिरेमठ, शिवसेनेतर्फे प्रा. सुनील शिंत्रे तर ‘स्वाभिमानी’कडून अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण ९ अर्ज दाखल झाले असले तरी हा सामना ‘तिरंगी’च होईल असे प्राथमिक चित्र आहे.गेल्या चार दशकातील तीन निवडणुकांचा अपवाद वगळता पालिकेवर जनता आघाडीचीच सत्ता राहिली आहे. अपवादाने सत्तांतर घडले त्यावेळच्या अनुक्रमे राजर्षी शाहू आघाडी व महालक्ष्मी आघाडीचे नेतृत्व दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्याकडे होते. गतवेळच्या राष्ट्रवादी-शहापूरकर गट आघाडीचे नेतृत्व कुपेकर व मुश्रीफ यांनी केले. त्यामुळे जनता दलापाठोपाठ राष्ट्रवादीचा शहरात प्रभाव आहे. जनता दल व राष्ट्रवादीच्या प्रभावाला छेद देण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे.भाजपच्या नेतृत्वाखालील संभाव्य महाआघाडीत शिवेसना व स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होण्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्यातील जागा वाटपासंदर्भात अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे ही आघाडी अद्याप चर्चेतच अडकली आहे.दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना गडहिंग्लज शहरात मिळालेली लक्षणीय मते विचारात घेवून नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्याला मिळावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांनी ही मागणी नेटाने लावून धरल्यास फेरबदल होवू शकतो. मात्र, रिंगणेसारखा कार्यकर्ता गमावल्यानंतर यमगेकरांना बाजूला करून भाजप धोका पत्करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच नगराध्यक्षपदाचा सामना तिरंगीच होईल असे स्पष्टपणे दिसत आहे. यात बाजी मारणाऱ्यांचेच यावेळी पालिकेत बहुमत राहील, असे जाणकारांचे मत आहे.१९७४ ची थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक काँगे्रसचे डॉ. एस. एस. घाळी व विरोधी आघाडीचे आप्पासाहेब नलवडे यांच्यात झाली. त्यात मोठ्या मताधिक्क्याने घाळी विजयी झाले. मात्र, २१ पैकी विरोधी आघाडीला १४ तर सत्ताधाऱ्यांना ७ जागा मिळाल्या होत्या. २००१ ची थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादीच्या निरूपमा बन्ने व जनता दलाच्या चंद्रकला पाटणे यांच्यात झाली. त्यात बन्ने विजयी झाल्या. त्यावेळी विरोधी राष्ट्रवादी, काँगे्रस, शिवसेना व भाजप युतीच्या महालक्ष्मी आघाडीला १७ तर सत्ताधारी जनता आघाडीला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या.