कोल्हापूर : ‘डोक्याला शॉट’ या वेगळ्या नावाच्या मराठीचे तमिळ फ्यूजन असलेल्या विनोदी सिनेमाच्या कलावंतांनी सोमवारी (दि. २५) ‘लोकमत’च्या कोल्हापूर कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला.या सिनेमाच्या दिग्दर्शक आणि प्रमुख कलावंतांनी सोमवारी ‘लोकमत’शी संवाद साधला. मूळचा कोल्हापूरचाच असलेला रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित या प्रमुख अभिनेत्यांसह सिनेमाचे दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी यांनी या सिनेमाचा प्रवास उलगडला. या सिनेमाची निर्मिती उत्तुंग ठाकूर यांनी केली आहे. प्रारंभी ‘लोकमत’चे उपव्यवस्थापक (इव्हेंट) दीपक मनाठकर यांनी पुष्पगुच्छ देऊन या कलावंतांच्या टीमचे स्वागत केले.
‘डोक्याला शॉट’ या आगामी मराठी सिनेमाच्या कलावंतांनी सोमवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी शिवकुमार पार्थसारथी, ओंकार गोवर्धन, रोहित हळदीकर आणि गणेश पंडित यांचे दीपक मनाठकर यांनी स्वागत केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)तमिळ सुब्बलक्ष्मी (प्राजक्ता माळी) आणि मराठी अभिजित (सुव्रत जोशी) यांच्या लग्नाच्या निमित्ताने कोल्हापूरचा रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन आणि गणेश पंडित या अभिजितच्या चार मित्रांची गोष्ट असलेला ‘डोक्याला शॉट’ हा मराठी सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, ३ मार्च रोजी कोल्हापुरात प्रीमिअर शो होत आहे; यासाठी या सिनेमातील सर्वच कलाकार येत आहेत, अशी माहिती या कलावंतांनी दिली.कोल्हापूरच्या रोहितची प्रमुख भूमिकाया सिनेमात रोहित हळदीकर हा कोल्हापूरचा युवक झळकला आहे. रोहितने यापूर्वी अनेक नाटकांत काम केले आहे, तसेच काही सिनेमेही केले आहेत. तो म्हणाला, एका वेगळ्या जॉनरचा हा सिनेमा आहे. ओंकार गोवर्धन याने यातील एका मित्राची भूमिका साकारली आहे. युवकांच्या मनातील काही गोष्टी या सिनेमातून मांडल्याचे तो म्हणाला.सिनेमाचे शीर्षक गाणे हिंदीतील दिग्गज गायक मिका सिंगने गायिले आहे, तर जोरूका गुलाम हे पार्टी गाणे हिंदीतीलच कैलास खेर यांनी गायिले आहे. या सिनेमात चार गाणी असून, दोन प्रत्यक्ष पडद्यावर पाहायला मिळणार आहेत, तर दोन प्रमोशनल साँग्ज आहेत. अमितराज, श्रीकांत-अनिता या दोन संगीतकारांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. याशिवाय हिंदीतील दिग्गज गायक मिका सिंग, कैलास खेर यांनीही या सिनेमातील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. ‘जोरू का गुलाम’ आणि ‘डोक्याला शॉट’ या गाण्यालाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.