- वसंत भोसलेतराव्या लोकसभेसाठी पहिल्या तीन टप्प्यांतील मतदान झाले. त्यामध्ये महाराष्टÑाचा बराच भाग होता. पश्चिम महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील मतदानही पूर्ण झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने ठिकठिकाणच्या तालुका किंवा जिल्हा पातळीवरील नेत्यांनी घेतलेल्या भूमिकांना ना वैचारिक आधार, ना राजकीय शहाणपणा होता. त्या केवळ माकडउड्या होत्या. त्यांना काही वैचारिक अधिष्ठान नव्हते किंवा ठाम राज्य तसेच राष्टÑहिताची भूमिका नव्हती. कालपर्यंत कॉँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष असणारा नेता एका रात्रीत भाजपवाल्यांना आपला उमेदवार म्हणून चालतो. आयुष्यभरच नव्हे, तर तीन पिढ्या कॉँग्रेसच्या कृपेने सत्ता भोगली, पदे घेतली, संपत्ती जमा केली; त्यांना अचानक साक्षात्कार झाला की, नरेंद्र मोदीच या देशाचे तारणहार आहेत. भाजपवाल्यांना, अशा धरसोड करणाऱ्यांना आणि स्वार्थासाठी पक्षप्रवेश करणाऱ्यांना रेड कार्पेट घालून स्वागत करण्यात मोठा राजकीय शहाणपणा तसेच डावपेच वाटू लागले आहेत. येनकेन प्रकारे सत्ताच हस्तगत करायची आहे. मग त्याला तुम्ही स्वैराचार म्हणा, वैचारिक गोंधळ म्हणा, माकडउड्या म्हणा किंवा व्यभिचार म्हणा; तुम्ही मतदारांना विचारून किंवा घाबरून राजकारण थोडेच करायचे असते? आम्ही दिलेला उमेदवार स्वीकारायचा आणि मतदान गुपचूप करायचे, असाच हा हुकूमशाही मामला आहे.राजकीय पक्षांची ही खेळी नवीन नाही. प्रथमच घडते आहे, असेही नाही. काही तरी अद्भुत किंवा अपवित्र घडते आहे, असेही नाही. मात्र, या घटनांतून राजकारणासारखा गांभीर्याने घ्यायचा विषय चेष्टेचा होतो आहे. त्यातील वैचारिक किंवा राजकीय भूमिका नष्ट होत जाते आहे. मतदारांनीही एका जाणीव-जागृतीने राजकीय निर्णय घ्यायला पाहिजे, ती पातळीच नष्ट होत जाते. मग तो एक माकडचेष्टेचा, जुगारबाजांचा तसेच जुमलेवाला डाव ठरतो. मागील सर्व विसरून जायचे, जातीय, धार्मिक, आर्थिक आणि स्वत:चा राजकीय स्वार्थ समोर ठेवून एका रात्रीत भूमिका बदलून टाकायची. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या साºया जिल्ह्यांत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली आहे. राजकीय पक्षांचे संघटनही इतके ढिले झाले आहे की, कोणी कोणाचे ऐकतच नाही. नेतृत्वाचा दबदबा नाही. सातारा जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे हे अध्यक्षपद तीन महिन्यांपूर्वीच दिले होते. त्यांनी सातारा जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व करावे, पालकत्व स्वीकारून पक्ष बळकट करावा, पक्षाच्या धोरणानुसार लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय लढाई करावी, अशी अपेक्षा होती. त्यांच्या नियुक्तीचे पत्र पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सहीने प्रसिद्धीस दिले होते. एका महत्त्वपूर्ण पदावर असलेल्या माणसाची राजकीय निष्ठा पाहा! हाच माणूस एका रात्रीत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आला. कॉँग्रेस पक्षाचा माणूस भाजपला चालतो. अध्यक्षपद स्वीकारलेल्या या माणसाचे वडील सातारचे शिवसेनेचे खासदार होते. याच मतदारसंघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे संजयमामा शिंदे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. ते अपक्ष असले तरी, भाजपच्या बळावर त्यांनी बहुमत जमा केले आहे. भाजपची सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ता आहे आणि त्याचे अध्यक्ष राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार होते. अकलूजचे मोठे राजकीय घराणे म्हणून मिरविणारे मोहिते-पाटील यांनी कहरच केला. राष्टÑवादी कॉँग्रेसचे विद्यमान खासदार असलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपले चिरंजीव माजी खासदार-आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपात प्रवेश करायला सांगितले. त्यांचे आजोबा आणि एक मातब्बर कॉँग्रेसचे नेते शंकरराव मोहिते-पाटील यांनी सत्तेत राहून अनेक कामे उभी केली. कॉँग्रेस पक्षाच्या बळावर सहकारी साखर कारखानदारी विकसित केली. सहकारातील सर्व लाभ या मंडळींनी उठविले आहेत. विजयसिंह मोहिते-पाटील सलग अनेक वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात होते. कोणत्याही खात्याचे मंत्री असोत, कोठेही प्रभाव पाडला नाही; पण राजकीय घराणे म्हणून त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून बाजूला करताच येत नव्हते. म्हणून ते सत्तेत होते. हे सर्व बळ त्यांना कॉँग्रेस पक्षानेच दिले होते. तेच कॉँग्रेसच्या विरोधात जाऊन बसले. भाजपने तहहयात त्यांना शिव्या देण्यात घालविली, आता पवित्र करून घेतले. देशाच्या पंतप्रधानांनी अकलूजच्या सभेत त्यांच्या नावाचा जय केला. किती महान मोहिते-पाटलांचे घराणे!मराठा समाजात जागृतीचे उत्तम काम करणारे आणि माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम करणारे अण्णासाहेब पाटील यांच्या चिरंजीवाने त्यांच्या वारशाचा लाभ उठवित राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची मिशी कधीही खाली-वर होत नाही. ती सतत ताठ (मानेने) उभी असते. मात्र, यांनी राजकीय स्वार्थासाठी माकडउड्यांचा विक्रमच केला आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे विद्यमान विधानपरिषदेचे सदस्य असताना भाजपमध्ये प्रवेश केला. कारण भाजप-शिवसेना युती होणार नाही, त्यामुळे साताºयातून भाजपतर्फे लढता येईल. युती झाली आणि यांची गोची झाली. उत्तर सोपे आहे. आमदार राष्टÑवादीचा, प्रवेश भाजपमध्ये, साताºयाची जागा शिवसेनेच्या वाट्याला! गणित सोडविणे सोपे आहे, शिवसेनेत प्रवेश करायचा. असा प्रवास करून येणाºयाला ‘मातोश्री’वर त्वरित प्रवेश! आणि वर्षानुवर्षे दगड हातात घेऊन रस्त्यावर आंदोलनाच्या नावाने शिमगा करणारे सैनिक साताºयाच्या माळावर बोंबा मारत बसले. मिशीला ताव मारत माथाडींच्या जोरावर पैलवान मैदानात आलाच. शरद पवार आणि चंद्रकांतदादा पाटील सर्व काही सिनेमाचा ट्रेलर पाहत होते. चंद्रकांतदादा यांची आतून फूस असणारच! त्यांना कोणत्याही पक्षाचा माणूस चालतो. (उद्या ओवैसींनी प्रवेश केला, तर त्यांनाही घेतील.)सांगलीत आणखीनच विचित्र परिस्थिती झाली. हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला! या मतदारसंघात सोळावेळा नियमित होणाºया निवडणुका आणि दोनवेळा पोटनिवडणुका अशा अठरा निवडणुका झाल्या आहेत. आताची निवडणूक एकोणिसावी आहे. अठरापैकी सोळावेळा कॉँग्रेसने एकतर्फी निवडणुका जिंकल्या आहेत. त्यापैकी अकरा निवडणुका वसंतदादा पाटील यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्यांनी जिंकल्या आहेत. २०१४ मध्ये मोदी लाटेत प्रतीक पाटील या दादांच्या नातवाचा पराभव झाला. खरे तर मतदारच दादा घराण्यावर प्रेम करून कंटाळले होते. कारण, ते एकतर्फीच होते. प्रतीक पाटील कधी हातही करायचा नाही किंवा तुमचे माझ्यावर प्रेम आहे, ते मी स्वीकारले आहे, असा डोळा मिचकवूनही सिग्नल द्यायचा नाही. बरे झाले, ती लाट आली, त्यात हा वृक्ष कोलमडून पडला. पुढे पाच वर्षांत कॉँग्रेसचे येथे अस्तित्व होते, असे निवडणुका जाहीर होताना सांगण्याची वेळ आली. उमेदवारी घेण्यास कोणी तयार होईना. (पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांचा अपवाद; पण त्यांना कोणी देणार नव्हते.) शेवटी कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा देऊन टाकली. वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना संघटनेच्या ‘बॅट’ चिन्हावर लढण्याची वेळ आली. भाजपचा उमेदवार आणि त्यांचे घराणे मूळचे कॉँग्रेसचेच! भाजपचा उसनाच उमेदवार; पण लाटेत निवडून आला आणि आता ते टिकविण्यासाठी तोंडाला फेस आला.सांगली जिल्ह्यातील वाळवा-शिराळा ही क्रांतिकारकांची भूमी! त्याची केंद्रे वाळवा आणि येडेमच्छिंद्र तसेच कुंडल ही आहेत. वाळवा म्हटले की, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांची आठवण येते. अण्णांनी संपूर्ण आयुष्यभर संघपरिवाराला विरोध केला आणि त्यांच्या नावावर जगणारे वारसदार वैभव नायकवडी आणि गौरव नायकवडी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. अण्णांचे छायाचित्र नरेंद्र मोदींबरोबर लावून सदाभाऊ खोतांचे जातीयवादी भाषण ऐकत होते. हातकणंगले मतदारसंघात बहुजनांचा खासदार झाल्यावर क्रांतिकारी परिवर्तन होणार आहे, प्रतिसरकार स्थापन होणार आहे, त्याचसाठी पेठनाक्यावर क्रांतिसिंह नाना पाटील कृषी महाविद्यालय स्थापन करू लागलो आहोत, असे आवेशपूर्ण भाषणात सदाभाऊ खोत सांगत होते. गेली पंचवीस वर्षे राजू शेट्टी यांच्याबरोबर शेतकरी चळवळीत असणारा हा ‘सदा’. यांचे अज्ञान किती असावे? त्यांना राजू शेट्टी हे जैन आहेत, हे समजायला पंचवीस वर्षे लागली. बिचाºयाला माहीतच नव्हते; अन्यथा त्यांना खासदार केलाच नसता. मराठेशाहीची किती मोठी पीछेहाट एका अज्ञानामुळे झाली? उशिरा का असेना, दुरुस्ती केली.नायकवडींची गोष्ट राहिलीच की! हेच नागनाथअण्णा नायकवडी यांची भूमिका संघपरिवाराबद्दल इतकी स्पष्ट होती की, जनता पक्षात संघपरिवार आहे, म्हणून चिक्कमंगळूरच्या पोटनिवडणुकीत इंदिरा गांधींचा विजय झाला पाहिजे, म्हणून भाकरी बांधून घेऊन गेले होते. ना कन्नड येत होते, ना तेथील लोकांना मराठी किंवा हिंदी समजत होते. १९९१ ची निवडणूक कºहाड लोकसभा मतदारसंघातून अण्णा लढत होते. प्रचारादरम्यान त्यांच्या गाड्यांचा ताफा एका गावाहून दुसºया गावाला जात होता. वाटेत लघुशंकेला थांबले. विरुद्ध बाजूने याच मतदार संघातील भाजपचे उमेदवार राजाभाऊ देशपांडे यांची गाडी आली. अण्णा आहेत
सराजकीय सोयीसाठी नेत्यांच्या माकडउड्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:57 PM