पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रूईकर कॉलनीतील जय भारत शिक्षण संस्थेची शाळा आहे. संस्थेचे संस्थापक परशुराम जाधव यांच्याकडून शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना वारंवार शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. सोमवारी शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील हे संस्थाचालकांच्या आदेशानुसार शिक्षकांना घेऊन फरशी घालणे, भिंतीचा गिलावा करणे, दरवाजा आणि कपाट दुरूस्तीची काम करत होते. संस्थाचालक जाधव तेथे आले. त्यांनी मुख्याध्यापक संजय पाटील यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर शाळेतील शिक्षक एकत्र आले. त्यांनी शिक्षक संघटनेच्या नेत्यांशी संपर्क साधला तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्यात संस्थाचालक जाधव यांच्या विरोधात तक्रार दिली. यावेळी खासगी प्राथमिक शिक्षण सेवक समिती, शिक्षक महासंघ आणि महानगरपालिका शिक्षण समितीचे भरत रसाळे, राजेंद्र कोरे, सुधाकर सावंत, शिवाजी भोसले, आनंदा हिरूगडे, राजू कोंडेकर, आनंदा हिरूगडे, राजू कोंडेकर, संजय पाटील, स्नेहल रेळेकर, भाग्यश्री पाटील आदी शिक्षक आणि संघटनांचे प्रतिनिधी जमा झाले होते.
संस्थाचालकाने केली मुख्याध्यापकालाच धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:32 AM